फोटो सौ Free Pik
लाईफस्टाईल

वेळीच टाळा पेनकिलर खाणे...नाहीतर आरोग्यावर होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

आजकाल शरीरात काहीतरी बिघाड झाला किंवा मान, डोके, हात, पाय, पोट दुखत असेल तर आपण पेनकिलर्सचा उपयोग करतो.

Krantee V. Kale

आजकाल शरीरात काहीतरी बिघाड झाला किंवा मान, डोके, हात, पाय, पोट दुखत असेल तर आपण पेनकिलर्सचा उपयोग करतो. पेनकिलर्स, म्हणजेच वेदनानाशक औषधे, जे शरीरातील वेदना कमी करण्यासाठी वापरले जातात. ही औषधे वेदना कमी करण्यास मदत करतात, पण त्यांचा वापर दीर्घकालीन किंवा अधिक प्रमाणात केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पेनकिलर्सचा वापर करत असताना त्यांच्या दुष्परिणामांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पेनकिलर्सचा वापर केल्याने काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती वाचा.

पेनकिलर्स औषधांच्या अधिक वापरामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे गॅस्ट्रिक इरिटेशन, पोटातील समस्या, आणि अल्सर होऊ शकतात. याशिवाय पचन प्रक्रियेचे विकार निर्माण होऊ शकतात आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

काही पेनकिलर्स जास्त वेळ घेतल्यास किडनी आणि लिव्हरवर देखील ताण येतो, ज्यामुळे त्यांचे कार्य कमी होऊ शकते आणि दीर्घ काळासाठी दुष्परिणाम होऊ शकतात.

पेनकिलर्सची इतर साइड इफेक्ट्स म्हणजे रक्तदाब वाढणे, हृदयाचे विकार आणि श्वसन समस्यांमध्ये अडचणी येणे. काही पेनकिलर्स शरीरातील सोडियमची पातळी वाढवू शकतात, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्याचप्रमाणे, काही पेनकिलर्समुळे श्वासोच्छ्वासाच्या समस्या आणि श्वसनातील त्रास होऊ शकतात.

पेनकिलर नेहमी खाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कोणत्याही गोळ्या किंवा औषधे खाण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दीर्घकालीन आणि अनियंत्रित वापरामुळे शरीराच्या विविध भागावर नको असणारे परिणाम होऊ शकतात. म्हणून, पेनकिलर वापरत असताना योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापर करणे आवश्यक आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video