केळी, दूध अन् गुळापासून बनवा टेस्टी खीर; वाचा झटपट रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

केळी, दूध अन् गुळापासून बनवा टेस्टी खीर; वाचा झटपट रेसिपी

दूध, केळी, गूळ, वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट्स यांच्या मदतीने तयार होणारी ही केळीची खीर चवीला मस्त लागते.

किशोरी घायवट-उबाळे

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली की नेहमीच जड मिठाई किंवा डेझर्ट खाण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या केळ्यांपासून तुम्ही स्वादिष्ट आणि झटपट खीर तयार करू शकता. दूध, केळी, गूळ, वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट्स यांच्या मदतीने तयार होणारी ही केळीची खीर चवीला मस्त लागते. विशेष म्हणजे ही खीर बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. डेझर्टसोबतच नाश्त्यासाठीही हा एक सोपा पर्याय ठरू शकतो.

साहित्य :

  • २ कप दूध

  • १ कप कुस्करलेले पिकलेले केळे

  • सजावटीसाठी १ केळे (कापलेले)

  • अर्धा टीस्पून वेलची पावडर

  • २ काड्या केशर

  • चवीनुसार गूळ पावडर

  • अर्धा कप आवडीनुसार चिरलेले ड्रायफ्रूट्स

कृती :

१. दूध आटवून घ्या - सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घेऊन मंद-मध्यम आचेवर गरम करा. दूध थोडे घट्ट होईपर्यंत अधूनमधून ढवळत राहा.

२. केशर आणि ड्रायफ्रूट्स घाला - दूध थोडे आटल्यावर त्यात केशराच्या काड्या, वेलची पावडर आणि चिरलेले ड्रायफ्रूट्स घाला. मंद आचेवर काही मिनिटे शिजू द्या. केशराचा रंग दुधात उतरला की गॅस बंद करा.

३. केळ्याचे मिश्रण तयार करा - पिकलेले केळे एका भांड्यात घेऊन ते व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यात तयार केलेले कोमट दूध हळूहळू घाला आणि मिश्रण एकजीव करा.

४. गूळ घालून सर्व्ह करा - चवीनुसार गूळ पावडर घालून खीर व्यवस्थित मिसळा. वरून कापलेले केळे आणि ड्रायफ्रूट्स घालून सजवा आणि सर्व्ह करा.

टिप्स :

  • खीर बनवण्यासाठी चांगली पिकलेली केळी वापरा. त्यामुळे खिरीला नैसर्गिक गोडवा आणि छान चव मिळते.

  • केळी थेट उकळत्या दुधात घालण्याऐवजी दूध थोडे कोमट झाल्यावर मिसळा.

  • गूळ घालताना दूध खूप गरम नसावे, अन्यथा दूध फाटण्याची शक्यता असते.

  • खीर जास्त घट्ट वाटत असल्यास आवश्यकतेनुसार थोडे कोमट दूध मिसळू शकता.

  • बदाम, काजू, पिस्ता किंवा अक्रोड यापैकी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरा.

  • खीर गरम किंवा थंड, दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते; मात्र थंड केल्यावर तिची चव आणखी खुलते.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता