मुलांना डब्यात रोज काय द्यायचं? १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक बीट-गाजर टिक्की; चव अशी की पुन्हा पुन्हा मागतील 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

मुलांना डब्यात रोज काय द्यायचं? १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक बीट-गाजर टिक्की; चव अशी की पुन्हा पुन्हा मागतील

मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी हेल्दी आणि चविष्ट पर्याय हवा आहे? कमी तेलात तयार होणारी पौष्टिक बीट-गाजर टिक्कीची ही सोपी रेसिपी जाणून घ्या. नाश्ता, संध्याकाळचा खाऊ आणि टिफिनसाठी बेस्ट.

Mayuri Gawade

शाळा सुरू झाल्यावर अनेक पालकांसमोर रोजचा एकच प्रश्न असतो, आज डब्यात काय द्यायचं? मुलांना आवडेल, पोटभर खाता येईल आणि त्याचबरोबर पौष्टिकही असेल असा पदार्थ शोधणं अनेकदा कठीण जातं. अशावेळी बीट आणि गाजरापासून बनवलेली चविष्ट टिक्की हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून हलकी कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली ही टिक्की नाश्ता, संध्याकाळचा खाऊ किंवा शाळेच्या डब्यासाठी सहज बनवता येते.

बीट आणि गाजर या दोन्ही भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हा पदार्थ पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवण्यास मदत करतो. कमी तेलात तयार होणारी ही टिक्की आरोग्यदायी असल्याने वजन नियंत्रणाची काळजी घेणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय आहे.

साहित्य

  • १ मध्यम आकाराचे बीट

  • २ गाजरे

  • १ उकडलेला बटाटा

  • अर्धा कप मटार

  • १ बारीक चिरलेला कांदा

  • २ हिरव्या मिरच्या

  • ५-६ लसूण पाकळ्या

  • १ इंच आलं

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • २ चमचे बेसन

  • १ चमचा कॉर्नफ्लोअर

  • १ चमचा धणेपूड

  • अर्धा चमचा हळद

  • लाल तिखट

  • चवीनुसार मीठ

  • आवश्यकतेनुसार तेल

कृती

बीट, गाजर आणि मटार स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर बीटाची साल काढून सर्व भाज्या आणि उकडलेला बटाटा एकत्र कुस्करून घ्या.

आलं, लसूण आणि हिरवी मिरची यांची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट कुस्करलेल्या मिश्रणात घाला. त्यात कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, धणेपूड, मीठ, कॉर्नफ्लोअर आणि बेसन घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा.

तयार मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करून टिक्कीचा आकार द्या. गरम तव्यावर थोडे तेल लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

गरमागरम बीट-गाजर टिक्की हिरव्या चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. ही टिक्की मुलांच्या टिफिनसाठीही उत्तम पर्याय ठरते.

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

बेपत्ता मुलाला मृत समजून केले अंत्यसंस्कार; काही दिवसांनी आला फोन, 'तो जिवंत आहे'

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले