रात्रीच्या जेवणाची वाढवा रंगत! घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी; पाहा सोपी रेसिपी

घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी कशी बनवायची? कोबी, गाजर आणि वाटाण्यापासून मऊ कोफ्ते व मसालेदार ग्रेव्ही तयार करण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
रात्रीच्या जेवणाची वाढवा रंगत! घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी; पाहा सोपी रेसिपी
रात्रीच्या जेवणाची वाढवा रंगत! घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी; पाहा सोपी रेसिपी'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

पाहुणे घरी येणार असोत किंवा नेहमीच्या भाज्यांऐवजी काहीतरी खास खायची इच्छा असेल, तर व्हेज कोफ्ता करी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कोबी, गाजर आणि हिरव्या वाटाण्यापासून तयार होणारे मऊ कोफ्ते आणि मसालेदार, क्रीमी ग्रेव्ही यामुळे ही डिश चवीला अप्रतिम लागते. कमी साहित्यामध्ये घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी व्हेज कोफ्ता करी कशी तयार करायची, ते जाणून घेऊया.

लागणारे साहित्य

कोफ्त्यासाठी

  • १ छोटा कोबी (किसलेला)

  • ३ ते ४ गाजरे (किसलेली)

  • अर्धी वाटी वाफवलेला हिरवा वाटाणा

  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या

  • २ टेबलस्पून डाळीचे पीठ

  • १ टेबलस्पून तांदळाचे पीठ

  • १ टीस्पून कसुरी मेथी

  • १ टीस्पून जिरे

  • अर्धा टीस्पून मिरेपूड

  • अर्धा ते १ टीस्पून लाल तिखट

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी तेल

रात्रीच्या जेवणाची वाढवा रंगत! घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी; पाहा सोपी रेसिपी
चुकीच्या वेळेत जेवताय? आयुर्वेदानुसार नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण करण्याची योग्य वेळ जाणून घ्या
रात्रीच्या जेवणाची वाढवा रंगत! घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी; पाहा सोपी रेसिपी
जेवणात तोंडी लावायला झणझणीत भरलेली हिरवी मिरची; वरण-भाताची चव होईल दुप्पट

ग्रेव्हीसाठी

  • २ मोठे कांदे

  • १ टोमॅटो

  • ३ ते ४ लसूण पाकळ्या

  • १ टेबलस्पून मगज बी

  • १ टीस्पून जिरे

  • १ टीस्पून कसुरी मेथी

  • १ टीस्पून किचन किंग मसाला

  • १ टीस्पून गरम मसाला

  • १ टीस्पून लाल तिखट

  • २ टेबलस्पून दही

  • आवश्यकतेनुसार गरम पाणी

  • चवीनुसार मीठ

फोडणीसाठी

  • १ टीस्पून मोहरी

  • चिमूटभर हिंग

  • २ सुक्या लाल मिरच्या

  • १ टेबलस्पून तेल

कृती

१. कोफ्त्याचे मिश्रण तयार करा

किसलेला कोबी आणि गाजर हलकेच दाबून अतिरिक्त पाणी काढा. त्यामध्ये वाफवलेला वाटाणा, बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या, डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, कसुरी मेथी, जिरे, मिरेपूड, लाल तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.

२. ग्रेव्ही तयार करा

कढईत थोडे तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, लसूण, जिरे, कसुरी मेथी आणि मगज बी परता. थोडे पाणी घालून सर्व साहित्य मऊ होईपर्यंत शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

३. मसालेदार ग्रेव्ही शिजवा

त्याच कढईत थोडे तेल गरम करून तयार पेस्ट घाला. त्यात लाल तिखट, किचन किंग मसाला, गरम मसाला आणि दही घालून तेल सुटेपर्यंत परता. नंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि मीठ घालून ग्रेव्हीला उकळी आणा.

रात्रीच्या जेवणाची वाढवा रंगत! घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी; पाहा सोपी रेसिपी
पावसाळ्यात रोजच्या चहाला द्या हटके ट्विस्ट! एकदा ट्राय करा कॅरॅमल टी; प्रत्येक घोटात मिळेल भन्नाट चव

४. कोफ्ते तळा

तयार मिश्रणाचे लहान गोळे करून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. सर्व्ह करण्याच्या काही मिनिटे आधी हे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घाला.

५. शेवटची फोडणी

छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी तयार करा. ही फोडणी ग्रेव्हीवर घालून झाकण ठेवून २ मिनिटे तसेच राहू द्या.

अशी करा सर्व्ह

गरमागरम व्हेज कोफ्ता करी बटर नान, तंदुरी रोटी, फुलका, पराठा किंवा जिरा राईससोबत सर्व्ह करा. वरून थोडी ताजी कोथिंबीर आणि एक चमचा फ्रेश क्रीम घातल्यास चव आणखी खुलते.

logo
marathi.freepressjournal.in