Freepik
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात जीन्स का वापरू नये? 'या' पँट्स आहेत मस्त पर्याय; मिळेल स्टायलिश 'लूक' अन् आरामही'लूक'

उन्हाळ्यात शक्यतो जीन्स वापरणे आरोग्याला अहितकारक असते. जीन्स न घालताही तुम्ही खूप स्टायलिश दिसू शकता, असे पर्याय आजच्या फॅशनच्या जगात उपलब्ध आहेत. जे शरीराला आरामदायकही असतात. चला पाहूया काय आहेत हे पर्याय.

Kkhushi Niramish

उन्हाळ्यात वातावरण खूप जास्त उष्ण असते. उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो. अशा वेळी अतिटाईट फिटिंग असलेल्या जीन्समुळे मांड्या आणि कंबरेला रॅशेश येऊ शकतात. जीन्सचे कापड हे खूप जाड असते. त्यात ते स्क्रीन फीटिंग असल्यामुळे त्यात घाम ताबडतोब शोषला जाऊ शकत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो जीन्स वापरणे आरोग्याला अहितकारक असते. जीन्स न घालताही तुम्ही खूप स्टायलिश दिसू शकता, असे पर्याय आजच्या फॅशनच्या जगात उपलब्ध आहेत. जे शरीराला आरामदायकही असतात. चला पाहूया काय आहेत हे पर्याय.

सिगार पँट्स

हा उन्हाळ्यात शरीराला सर्वात जास्त आराम देणारा पर्याय आहे. या पँट्स विविध रंगांमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतात. याचे मटेरियल मोठ्या प्रमाणात कॉटन तसेच खादीचे असते. या अनेक वेळा स्ट्रेट असतात. त्यामुळे त्या अंगाला खूप चिकटत नाहीत. परिणामी हवा खेळती राहून आपल्याला गारव्याचा अनुभव देते. याशिवाय या पँट्स बजेटमध्येही असतात. यावर छान प्रिंटेड कुर्ते तुम्ही घालू शकता.

जॉगर्स

सध्या मार्केटमध्ये जॉगर्स पँट्स ट्रेंड्समध्ये आहेत. या पँट वापरायला सुलभ, वजनाने हलक्या आणि आरामदायक फिटींगच्या असतात. त्यामुळे लोक खास उन्हाळ्यासाठी या पँट्स घालायला पसंत करत आहेत. यामध्ये शक्यतो उन्हाळ्यात डोळ्यांना सुखावणारे हलके रंग जसे की लाइट ग्रे, फिका तपकिरी, हलका निळा असे रंग असतात. यावर तुम्ही क्रॉप टॉप घालू शकता.

पलाझो

हल्ली मार्केटमध्ये प्रिंटेड पलाझो आल्या आहेत. यामध्ये सेमी पलाझो आणि लार्ज पलाझो असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकार खूप छान अॅट्रॅक्टिव्ह दिसतात. शिवाय याचे कापड या पँट्स अंगला अगदीच चिकटत नसल्याने या आरामदायी ठरतात. यावर तुम्ही कोणतेही स्टायलिश क्रॉप टॉप घालू शकतात.

धोती पँट

धोती पँट्स हा तुम्हाला जर कूल एथनिक लूक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही धोती पँटचा पर्याय निवडू शकता. याचा धोतीप्रमाणे आकार तुम्हाला ट्रॅडिशनल लूक देतो. सोबतच सुती कापडामुळे शरीराला आरामदायी स्पर्श मिळतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत