फोटो : पिंटरेस्ट
लाईफस्टाईल

Bhau Beej 2025 : कुठे 'भाई दूज', कुठे 'भाई फोटा'; महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये 'या' नावांनी साजरी होते भाऊबीज

दिवाळीचा हा अखेरचा आणि अतिशय गोड असा सण महाराष्ट्रात 'भाऊबीज' म्हणून ओळखला जातो. तर नेपाळमध्ये हा सण भाई तिहार किंवा...

Mayuri Gawade

भावाबहिणीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि स्नेह साजरा करणारा सण म्हणजे 'भाऊबीज'. हा सण कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. दिवाळीचा हा अखेरचा आणि अतिशय गोड असा सण महाराष्ट्रात 'भाऊबीज' म्हणून ओळखला जातो. मात्र, भारताच्या वेगवेगळ्या भागांत हा सण विविध नावांनी आणि वेगवेगळ्या प्रथा-परंपरांसह साजरा केला जातो.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा

या तीन राज्यांमध्ये मराठी आणि कोकणी भाषिक समुदायात हा सण भाऊबीज, भाव बीज किंवा भाई बीज या नावांनी साजरा होतो. भावाला रंगोळीने सजवलेल्या चौकोनी पाटावर बसवले जाते, बहिण त्याचे औक्षण करते आणि त्याला गोड पदार्थ भरवते. भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करून गिफ्ट्सची देवाणघेवाण केली जाते.

नेपाळ

नेपाळमध्ये हा सण भाई तिहार किंवा भाई टिका नावाने साजरा केला जातो. ‘तिहार’ म्हणजे कपाळावर लावला जाणारा कुंकवाचा टिळा. बहिण भावाला टिका लावून त्याच्या आयुष्यभर सुख-समृद्धीची कामना करते.

बिहार

बिहारमध्ये या सणाची परंपरा थोडी वेगळी आहे. येथे बहिण भावाला हलक्याफुलक्या शब्दांत फटकारते, त्याने केलेल्या चुकांबद्दल बोलते आणि शेवटी त्याची माफी मागते. ही परंपरा भावंडांतील सुसंवाद आणि आत्मीयता वाढवण्यासाठी पाळली जाते. नंतर औक्षण करून मिठाई भरवली जाते.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये भाऊबीज म्हणजे भाई फोटा. या दिवशी बहिण भावासाठी उपवास धरते. औक्षण करून उपवास सोडते आणि भावाकडून भेटवस्तू घेते. या सणात बहिणीच्या प्रार्थनेचा आणि भावाच्या आशीर्वादाचा सुंदर संगम दिसतो.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात हा सण भाई दूज म्हणून ओळखला जातो. बहिण भावाचे औक्षण करून त्याला साखरेचे बत्तासे खाऊ घालते. येथे सुक्या खोबर्‍याची देणगी देण्याची खास परंपरा आहे.

प्रत्येक प्रांतात पद्धती वेगळ्या असल्या, तरी या सणाचा सार एकच आहे. भावाबहिणीचं नातं हे जगातलं सर्वात शुद्ध नातं आहे, आणि भाऊबीज त्याच प्रेमाची उजळणी करणारा सण आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर