Freepik
लाईफस्टाईल

काळा तांदूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरत आहे वरदान; आहारात करा समावेश, आरोग्य होईल उत्तम

मधुमेहच्या रुग्णांना अनेक वेळा भाताचे वेगवेगळे व्यंजन खाण्याची इच्छा असते. मात्र, भातामुळे साखर वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक वेळा स्वतःचे मन मारावे लागते. मात्र, आता मधुमेहाचे रुग्ण मनसोक्त भात खाऊ शकतात.

Kkhushi Niramish

मधुमेहच्या रुग्णांना अनेक वेळा भाताचे वेगवेगळे व्यंजन खाण्याची इच्छा असते. मात्र, भातामुळे साखर वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक वेळा स्वतःचे मन मारावे लागते. मात्र, आता मधुमेहाचे रुग्ण मनसोक्त भात खाऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना काळा तांदूळ हा वरदान ठरत आहे. तर फिटनेससाठी चिंतीत असणाऱ्यांना सुद्धा काळा तांदूळ खाल्ल्याने निश्चितच फायदा मिळणार आहे. चला जाणून घेऊया याचे गुणधर्म आणि फायदे.

मोठ्या प्रमाणात फायबर

काळा तांदळात कोंड्याचा थर टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे यामध्ये फायबर उच्च प्रमाणात असते.

पचनसंस्था सुधारते

फायबरमुळे पचनसंस्था सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत मिळते.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी

काळा तांदळातील अत्युच्च फायबरमुळे शरीराला धोकादायक कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध

काळा तांदूळ हा अँटिऑक्सिडंट्सचा एक शक्तिशाली स्रोत आहे, विशेषतः अँथोसायनिन्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स, ज्यामुळे त्याला गडद काळा रंग मिळतो. अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात, ज्यामुळे कर्करोग आणि हृदयरोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स

काळ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या तांदळापेक्षा खूपच कमी असतो. कमी जीआय असलेले अन्न हळूहळू पचते आणि रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होण्यास प्रतिबंध करते, जे मधुमेहींसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

मधुमेहाच्या रुग्णांच्या हृदयाचे आरोग्य जपते

मधुमेहच्या रुग्णांना हृदयाचे आरोग्य मोठ्या प्रमाणात जपावे लागते. काळ्या तांदळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. काळ्या तांदळाचे नियमित सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

काळ्या तांदळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी तुम्ही कमी खाता. यामुळे कॅलरीजचे सेवन नियंत्रित करण्यास आणि वजन नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’