Buddha Purnima 2026 : सकाळची सुरुवात तथागत बुद्धांच्या सकारात्मक विचारांनी करा; दिवस जाईल आनंदी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Buddha Purnima 2026 : सकाळची सुरुवात तथागत बुद्धांच्या सकारात्मक विचारांनी करा; दिवस जाईल आनंदी

भगवान बुद्धांनी आयुष्याकडे पाहण्याचा साधा, शांत आणि संतुलित दृष्टिकोन दिला. त्यांच्या शिकवणीत संयम, शांतता, करुणा आणि सकारात्मकतेचा गाभा आहे.

किशोरी घायवट-उबाळे

आजच्या धावपळीच्या आयुष्यात दिवसाची सुरुवात कशी होते, यावर संपूर्ण दिवसाचा मूड ठरत असतो. सकाळची सुरुवात जर शांत, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांनी झाली, तर मनही दिवसभर स्थिर आणि प्रसन्न राहते. म्हणूनच बुद्ध पौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी तथागत भगवान बुद्धांचे विचार वाचून दिवसाची सुरुवात करणे अधिक अर्थपूर्ण ठरते.

भगवान बुद्धांनी आयुष्याकडे पाहण्याचा साधा, शांत आणि संतुलित दृष्टिकोन दिला. त्यांच्या शिकवणीत संयम, शांतता, करुणा आणि सकारात्मकतेचा गाभा आहे. मन शांत ठेवायचे असेल, ताण कमी करायचा असेल आणि दिवस आनंदी घालवायचा असेल, तर सकाळी काही मिनिटे बुद्धांचे विचार वाचणे ही उत्तम सवय ठरू शकते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त दिवसाची सुरुवात सकारात्मक करणारे तथागत बुद्धांचे हे प्रेरणादायी विचार नक्की वाचा.

१. मन हेच सर्वकाही आहे. तुम्ही जसे विचार करता, तसेच तुम्ही बनता.

२. शांतता बाहेर सापडत नाही, ती आपल्या मनातून निर्माण होते.

३. भूतकाळाचा विचार करू नका, भविष्याची चिंता करू नका, मन वर्तमानात ठेवा.

४. आनंद हा असाच मिळत नाही, तो आपल्या कृतीतून निर्माण होतो.

५. राग धरून ठेवणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या नाशाची अपेक्षा ठेवणे.

६. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे श्रेष्ठ आहे.

७. तुमच्या जीवनाची दिशा तुमचे विचार ठरवतात.

८. जिथे प्रेम आणि करुणा असते, तिथेच खरी शांती असते.

९. स्वतःला समजून घेतले, की जग समजणे सोपे होते.

१०. दररोज नवी सुरुवात करा, कारण प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते.

११. दुसऱ्यांवर प्रेम करा, पण स्वतःची किंमत विसरू नका.

१२. स्वच्छ मन, शांत विचार आणि चांगली कृती हेच खरे सुख.

१३. तुमचा प्रत्येक विचार तुमचे भविष्य घडवत असतो.

१४. मनातील अंधार दूर झाला, की जीवनात प्रकाश आपोआप येतो.

१५. सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस कधीच हरवत नाही.

दिवस सकारात्मक कसा जाईल?

सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे शांत बसून बुद्धांचे विचार वाचल्यास मनातील गोंधळ कमी होतो. नकारात्मक विचारांपासून दूर राहून मन अधिक स्थिर होते. यामुळे दिवसाची सुरुवात शांततेने होते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.

बुद्धांचे विचार केवळ प्रेरणा देत नाहीत, तर मनाला स्थिर ठेवण्याची ताकदही देतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात अशा सकारात्मक विचारांनी केली, तर संपूर्ण दिवस आनंदी आणि सकारात्मक जाऊ शकतो.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल