Freepik & Ai Generated image
लाईफस्टाईल

गुढी पाडव्याला 'या' गोष्टी खरेदी केल्याने घरात वाढेल समृद्धी आणि नांदेल सूख-शांती

हिंदू नववर्ष रविवारी (दि.30) सुरू होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस गुढी पाडवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महाराष्ट्रात घरोघरी मांगल्याची, आनंदाची, सुख-समृद्धीची गुढी उभारली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो. त्यामुळे या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.

Kkhushi Niramish

हिंदू नववर्ष रविवारी (दि.30) सुरू होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस गुढी पाडवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. महाराष्ट्रात घरोघरी मांगल्याची, आनंदाची, सुख-समृद्धीची गुढी उभारली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो. त्यामुळे या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. तसेच या गोष्टी खरेदी केल्याने घरात वर्षभर धन-धान्य टिकून राहते. आर्थिक समृद्धी येते आणि सूख शांती नांदते. जाणून घेऊ गुढी पाडव्याला कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या.

पारंपारिक धान्य

गुढी पाडव्याला घरात पारंपारिक धान्य खरेदी करण्याला मोठे महत्त्व असते. जसे की तांदूळ, गहू, जवारी इत्यादी. भारतीय परंपरेत अशी मान्यता आहे की गुढी पाडव्याला धान्य खरेदी करून ठेवल्याने संपूर्ण वर्ष अन्नधान्याची कमी होत नाही. घर कायम अन्नधान्याने समृद्ध असते.

सोने खरेदी

गुढी पाडव्याला सोने खरेदीला फार महत्त्व आहे. सोने हा धातू सर्वात मौल्यवान धातू आहे. गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केल्यास घरात श्रीमंती वाढते. पुढील संपूर्ण वर्ष घरात आर्थिक अडचण उद्भवत नाही. कारण या दिवशी खरेदी केलेल्या सोने धातूला सुवर्ण लक्ष्मी असे मानले गेले आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला अनेकजण आवर्जून सोन खरेदी करतात.

चांदी खरेदी

सोन्या प्रमाणेच चांदी या धातूला देखील खूप जास्त महत्त्व आहे. आपल्याकडे ज्याच्याकडे भरपूर चांदी आहे. त्याकडे समृद्धी आहे, असे मानले जाते. कारण भारतीय संस्कृती आणि परंपरेत चांदी या धातूला समृद्धीचं प्रतिक मानले गेले आहे. अनेक वेळा अचानक खूप मोठा लाभ झाल्यास किंवा फायदा झाल्यास 'चांदी झाली' असे म्हणतात. त्यामुळे गुढी पाडव्याला चांदी या धातूचे नाणे किंवा लक्ष्मीचे चित्र असलेला चांदीचा सिक्का खरेदी करण्याची परंपरा आहे. यामुळे वर्षभर घरात समृद्धीचा ओघ वाढतो.

वस्त्र खरेदी

गुढी पाडव्याला नवीन रेशमी किंवा खादीचे वस्त्र खरेदी करण्याला मोठा मान आहे. वस्त्रांना भारतीय संस्कृतीत 'वस्त्र लक्ष्मी' असे म्हणतात. या दिवशी नवीन वस्त्र खरेदी करणे हे समृद्धी टिकवण्याचे लक्षण मानले जाते.

याशिवाय गुढी पाडव्याला नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की मोबाईल, लॅपटॉप इत्यादी गोष्टी खरेदी करण्याची देखील शुभ मानले जाते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल