(Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

Sunday Special Recipe : अंड्यांना द्या हटके ट्विस्ट! नाश्त्याला बनवा 'चिली ऑइल एग्स'; झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

सुगंधी मिरचीचे तेल, लसूण-आल्याची चव आणि खास टेक्निकमुळे ही डिश घरच्यांना नक्कीच आवडेल.

किशोरी घायवट-उबाळे

साधे उकडलेले अंडे नेहमीच खाऊन कंटाळा आलाय? मग या रविवारी नाश्त्याला करा काहीतरी हटके ट्राय करा. "चिली ऑइल एग्स" ही रेसिपी साध्या अंड्यांना देते स्पायसी आणि फ्लेवरफुल टेस्ट. सुगंधी मिरचीचे तेल, लसूण-आल्याची चव आणि खास टेक्निकमुळे ही डिश घरच्यांना नक्कीच आवडेल.

साहित्य :

  • अंडी - ४

  • मिरच्या - ६ ते ७ बर्ड्स आय (आकाराने लहान असलेली बरीच तिखट मिरची)

  • तेल - अर्धा कप

  • लसूण पाकळ्या - ८ ते १०

  • आलं - १ इंच

  • स्प्रिंग ओनियन (हिरव्या पानांसह) - ३

  • कोरियन इंस्टंट नूडल्स सिझनिंग - २ टीस्पून

  • पांढरे तीळ - २ टीस्पून

  • व्हिनेगर - २ टीस्पून

  • मीठ - अर्धा टीस्पून

कृती :

एका खोल पॅनमध्ये पाणी घ्या, त्यात अंडी टाका आणि साधारण १२ मिनिटे उकळा. अंडी लगेच थंड पाण्यात टाका आणि सोलून अर्धी कापा. लसूण, आलं आणि मिरच्या बारीक चिरून एका बाउलमध्ये घ्या. स्प्रिंग ओनियन (हिरवा भाग व कांदा) चिरून त्यात मिसळा. सर्व अंडी प्लेटमध्ये मांडून ठेवा.


त्यानंतर, कढईत तेल गरम करून ते चिरलेल्या मिश्रणावर ओता. त्यात सिझनिंग, तीळ आणि मीठ घालून नीट मिसळा. तयार मिश्रण अंड्यांवर ओता आणि गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • अंडी उकळल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाकल्यास सोलणे सोपे होते.

  • तेल खूप जास्त तापवू नका, नाहीतर लसूण जळू शकतो.

  • अधिक तिखट हवे असल्यास मिरच्यांचे प्रमाण वाढवा.

  • थोडा सोया सॉस घातल्यास चव आणखी वाढते.

  • ब्रेड किंवा भातासोबतही ही डिश भन्नाट लागते.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके