लाईफस्टाईल

त्वचेसाठी फायदेशीर आहे मक्याचे पीठ; वाचा सविस्तर

Swapnil S

मका खायला सर्वाना आवडतो. मक्याचे कणीस किंवा मक्यापासून बनवले जाणारे अनेक खाद्यपदार्थ हे सगळ्यांनाच खायला खूप आवडतात. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक आढळतात . त्यामुळे, मका हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

हिवाळ्यामध्ये मक्याची बाजारात मोठी आवक निर्माण होते. त्यामुळे, या दिवसांमध्ये मक्याचे खूप प्रमाणात सेवन केले जाते. मात्र, तुम्हाला माहित आहे का? की आरोग्यासोबतच मका हा आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुम्हाला मक्याच्या पीठापासून बनवल्या जाणाऱ्या काही सोप्या फेसपॅक्सबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. हे फेसपॅक्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. या फेसपॅक्समुळे तुमची त्वचा अधिक उजळण्यास मदत होऊ शकते.

कॉर्नफ्लोअर आणि नारळाच्या दूधाचा फेसपॅक-

बिना डागाच्या त्वचेसाठी आणि चमकदार चेहऱ्यासाठी हा फेसॅपक खूप फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात ३-४ चमचे कॉर्नफ्लोअर घ्या आणि त्यामध्ये २ चमचे नारळाचे दूध मिक्स करा आणि चिमूटभर हळद मिक्स करा.

या मिश्रणाची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावून ठेवा . १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. या फेसपॅकमुळे ब्लॅकहेड्स आणि डार्कसर्कलची समस्या दूर होईल. हा फेसपॅक आठवड्यातून किमान २ वेळा चेहऱ्यावर लावा.

कॉर्नफ्लोअर आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक-

त्वचेसाठी तांदळाचे पीठ खूप फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मक्याचे पीठ आणि तांदळाच्या पीठाचा हा फेसपॅक त्वचेवर ग्लो आणण्यास

खुप मदत करतो. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीत २ चमचे कॉर्नफ्लोअर घ्या आणि त्यामध्ये २-३ चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा.

या मिश्रणात चिमूटभर हळद आणि २-३ थेंब गुलाबजल मिसळा. या सगळ्याची चांगली पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. साधारणपणे २०-२५ मिनिटांनी चेहरा धुवा टाका. चेहरा धुताना कोमट पाण्याचा वापर करा. हा फेसपॅक आठवड्यातून २ वेळा चेहऱ्यावर लावा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त