ग्लो हवाय? मग कॉस्मेटिक निवडताना 'ही' बेसिक चेकलिस्ट लक्षात ठेवा 
लाईफस्टाईल

ग्लो हवाय? मग कॉस्मेटिक निवडताना 'ही' बेसिक चेकलिस्ट लक्षात ठेवा

बाजारात असंख्य कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमकं कोणतं प्रोडक्ट योग्य आहे, हे ठरवणं कठीण जातं. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणतंही प्रोडक्ट फक्त जाहिरात पाहून किंवा ट्रेंड पाहून वापरणं त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतं.

Mayuri Gawade

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नीटनेटके आणि आकर्षक दिसणं अनेकांसाठी महत्त्वाचं बनलं आहे. ऑफिस, कॉलेज, पार्टी किंवा दैनंदिन वापरासाठी विविध कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. बाजारात असंख्य पर्याय उपलब्ध असल्यामुळे नेमकं कोणतं प्रोडक्ट योग्य आहे, हे ठरवणं कठीण जातं. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणतंही प्रोडक्ट फक्त जाहिरात पाहून किंवा ट्रेंड पाहून वापरणं त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतं.

कॉस्मेटिक खरेदी करण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे.

इनग्रेडिएंट्स वाचल्याशिवाय खरेदी करू नका

प्रोडक्टच्या लेबलवर दिलेले घटक नीट वाचा. काही रसायनं संवेदनशील त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. शक्यतो पॅराबेन-फ्री, सल्फेट-फ्री आणि डर्मेटोलॉजिकली टेस्टेड प्रोडक्ट्सची निवड करा. त्वचेवर प्रयोग करण्यापेक्षा माहिती घेणं अधिक सुरक्षित ठरतं.

तुमचा स्किन टाइप ओळखा

तुमची त्वचा कोरडी, तेलकट, मिश्र (कॉम्बिनेशन) की सामान्य आहे हे आधी निश्चित करा. ऑयली स्किनसाठी मॅट फाउंडेशन योग्य ठरतं, तर कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग बेस असलेली उत्पादने उपयुक्त असतात. चुकीचा प्रकार निवडल्यास त्वचेवर पिंपल्स, रॅशेस किंवा कोरडेपणा वाढू शकतो.

स्किन टोन आणि अंडरटोन महत्त्वाचा

फाउंडेशन, कन्सीलर किंवा लिपस्टिक घेताना त्वचेचा अंडरटोन - वॉर्म, कूल किंवा न्यूट्रल आहे ते ओळखा. चुकीचा शेड निवडल्यास मेकअप नॅचलर दिसत नाही. शक्य असल्यास प्रोडक्ट टेस्ट करूनच खरेदी करा.

ऑनलाईन खरेदीत सावधगिरी बाळगा

ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकांचे रिव्ह्यू, रेटिंग आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासा. काही वेळा फोटो आणि प्रत्यक्ष प्रोडक्टमध्ये फरक असतो. अधिकृत किंवा विश्वासार्ह वेबसाईटवरूनच खरेदी करणं सुरक्षित ठरतं.

एक्सपायरी डेट तपासणं विसरू नका

मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट आणि पॅकेजिंग नीट तपासा. एक्सपायर्ड प्रोडक्ट वापरल्यास त्वचेवर इन्फेक्शन, रॅशेस किंवा अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते.

सुंदर दिसण्यासाठी सुरक्षित पर्याय निवडा

कॉस्मेटिक म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे, तर त्वचेची काळजीही आहे. योग्य माहिती, योग्य निवड आणि थोडी जागरूकता यामुळे त्वचा निरोगी राहते. ट्रेंडपेक्षा तुमच्या त्वचेच्या गरजेला प्राधान्य द्या, कारण सुंदरतेपेक्षा सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके