छायाचित्र : कॅनव्हा
लाईफस्टाईल

सर्दी-खोकला होईल झटकन दूर! प्या मस्त गरमागरम क्रिम गार्लिक मशरूम सूप

सध्याचे थंडीचे दिवस आणि मध्येच सुरू झालेला पाऊस यामुळे हवेत गारवा आणि सर्दी-खोकल्याचा त्रास वाढलाय. अशा वेळी गरमागरम काहीतरी प्यायलं, की शरीरालाही ऊब मिळते आणि घश्यालाही आराम मिळतो. म्हणूनच आज जाणून घ्या स्वादिष्ट आणि आरोग्यदायी क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची सोपी रेसिपी!

Mayuri Gawade

थंडीचे दिवस सुरू झालेत आणि मध्येच पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा आणखीनच वाढलाय. या बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्याचा त्रास होणं अगदी सामान्य आहे. अशा वेळी गरमागरम काहीतरी प्यायलं, की शरीरालाही ऊब मिळते आणि घश्यालाही आराम मिळतो. सूप हा अशा हवामानातला उत्तम उपाय आहे. त्यातही क्रिम गार्लिक मशरूम सूप केवळ स्वादिष्ट नाही, तर सर्दी-खोकल्यावर आराम देणारं आणि आरोग्यदायीही आहे. चला तर मग जाणून घेऊया हे सूप काही मिनिटांत घरच्या घरी कसं बनवायचं.

साहित्य

४ ते ५ मशरूम

१/२ कप चिरलेला कांदा

२ ते ३ लसूण पाकळ्या

१/२ इंच आले

३ ते ४ कोथिंबीर काड्या

थोडी कोथिंबीर सजावटीसाठी

१ चमचा बटर

१ चमचा मिरपूड

चवीनुसार मीठ

१/२ कप दूध

१ चमचा लिंबू रस

आवश्यकतेनुसार पाणी

कृती

मशरूम, कांदा, कोथिंबीर काड्या, आलं, लसूण आणि लिंबू हे सर्व चिरून घ्या. पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर काड्या टाका. हे मिश्रण १-२ मिनिटे परता. यानंतर त्यात मशरूम, मीठ आणि मिरपूड घालून एकत्र करा. २-३ मिनिटे शिजू द्या. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मशरूमचे दोन-दोन तुकडे करून घ्या. कढईत थोडं ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात मशरूम, बारीक चिरलेला लसूण, मीठ आणि काळी मिरी टाकून परता. मशरूम चांगले शिजवा. दुसऱ्या पॅनमध्ये बटर वितळवा. त्यात थोडा मैदा टाका आणि हलक्या आचेवर परता. मैद्याचा रंग बदलला की त्यात मशरूम आणि व्हेजिटेबल स्टॉक (किंवा पाणी) टाका. थोडं थाईम घाला आणि हे मिश्रण वारंवार हलवत राहा. सूप घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडासा सोया सॉस आणि फ्रेश क्रिम टाका. सर्व घटक एकत्र मिसळा आणि काही मिनिटं उकळा.

सर्व्हिंग टिप

गरमागरम सूप बाऊलमध्ये ओतून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी मिरपूड शिंपडून हे सूप सर्व्ह करा आणि आनंद घ्या!

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग