ब्रेकफास्टमध्ये काहीतरी वेगळं खायचंय? झटपट बनवा क्रिस्पी ओनियन रिंग्स 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

ब्रेकफास्टमध्ये काहीतरी वेगळं खायचंय? झटपट बनवा क्रिस्पी ओनियन रिंग्स

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा स्नॅक पाहुणे आल्यावर किंवा पार्टीसाठीही झटपट बनवता येतो.

किशोरी घायवट-उबाळे

पावसाळ्यात ब्रेकफास्टमध्ये काहीतरी कुरकुरीत आणि चवदार खायची इच्छा होत असेल, तर फ्राईड ओनियन रिंग्स हा उत्तम पर्याय आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेल्या या ओनियन रिंग्स काही मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी सहज तयार होतात. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा स्नॅक पाहुणे आल्यावर किंवा पार्टीसाठीही झटपट बनवता येतो.

साहित्य :

बॅटरसाठी

  • १ कप मैदा

  • १/२ टीस्पून मीठ

  • १/२ टीस्पून बेकिंग पावडर

  • १ टीस्पून लसूण पावडर

  • १ टीस्पून काळी मिरी पावडर

  • १ टीस्पून ओरिगॅनो

  • १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल

  • १ टेबलस्पून दूध

  • १/२ कप पाणी

एग मिक्ससाठी

  • १ अंड्याचा पांढरा भाग

  • १/४ टीस्पून मीठ

  • १/२ टीस्पून काळी मिरी पावडर

इतर साहित्य

  • २ मोठे कांदे

  • आवश्यकतेनुसार ब्रेडक्रम्ब्स

  • तळण्यासाठी तेल

कृती :

एका भांड्यात मैदा, मीठ, बेकिंग पावडर, लसूण पावडर, काळी मिरी पावडर आणि ओरिगॅनो एकत्र करा. त्यात ऑलिव्ह ऑइल, दूध आणि पाणी घालून गाठी न राहता गुळगुळीत बॅटर तयार करा. वेगळ्या भांड्यात अंड्याचा पांढरा भाग, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून चांगले फेटून घ्या.

कांद्याचे जाडसर गोल काप करून त्यातील रिंग्स वेगळ्या करा. प्रत्येक कांद्याची रिंग प्रथम मैद्याच्या बॅटरमध्ये बुडवा. त्यानंतर एग मिक्समध्ये घोळवून शेवटी ब्रेडक्रम्ब्समध्ये व्यवस्थित कोट करा. कढईत तेल गरम करून तयार रिंग्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

तळलेल्या रिंग्स टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निघू द्या. गरमागरम ओनियन रिंग्स हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा.

रेसिपी बनवताना लक्षात ठेवा

  • मोठे कांदे वापरल्यास रिंग्स अधिक आकर्षक दिसतात.

  • अधिक कुरकुरीत टेक्स्चरसाठी ब्रेडक्रम्ब्स दोनदा लावू शकता.

  • तेल पुरेसे गरम झाल्यावरच रिंग्स तळा, त्यामुळे त्या जास्त तेल शोषत नाहीत.

  • ओरिगॅनोऐवजी इटालियन सीझनिंग किंवा चिली फ्लेक्सही वापरू शकता.

  • एगलेस रेसिपी हवी असल्यास अंड्याऐवजी थोडे कॉर्नफ्लोअरचे पातळ मिश्रण वापरू शकता.

  • फ्राईड ओनियन रिंग्स गरमागरम खाल्ल्यास त्यांची चव आणि कुरकुरीतपणा अधिक चांगला लागतो. त्यामुळे तळल्यानंतर लगेच सर्व्ह करणे उत्तम.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके