लाईफस्टाईल

Dark Circles Home Remedy : डार्क सर्कल्सनी हैराण? 'या' घरगुती फेसपॅकने काही मिनिटांतच मिळवा नैसर्गिक ग्लो

बाजारातील क्रीम काही दिवसांपुरते चमक देतात, पण नैसर्गिक ग्लो टिकवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतात. बटाटा नैसर्गिक थंडावा...

Mayuri Gawade

कामाच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक महिला आपल्या त्वचेची योग्य काळजी घेण्यात मागे पडतात. अपुरी झोप, मानसिक तणाव, जंक फूड, तिखट आणि तेलकट पदार्थांचे जास्त सेवन या सगळ्यामुळे शरीरासह त्वचासुद्धा परिणामित होते. विशेषतः डोळ्यांखाली आलेले काळे डाग किंवा डोळ्यांखालील काळी वर्तुळे त्वचेचे सौंदर्य कमी करतात आणि चेहरा निस्तेज, थकलेला दिसतो. हार्मोनल बदलांमुळे चेहर्‍यावर पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स वाढत जातात.

बाजारातील क्रीम, लोशन किंवा सीरम काही दिवसांपुरते चमक आणतात, पण नैसर्गिक ग्लो टिकवण्यासाठी घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात. त्यातच बटाटा हा एक उत्कृष्ट नैसर्गिक पर्याय आहे. बटाट्यामध्ये असलेला नैसर्गिक थंडावा डोळ्यांभोवती उष्णता कमी करण्यास मदत करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो. बटाटा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे त्वचेवरील डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन कमी होतो.

बटाट्याचा फेसपॅक करण्याची सोपी पद्धत:

  1. एका वाटीत तांदळाचे पीठ घ्या.

  2. त्यात चिमूटभर हळद आणि थोडा बटाट्याचा रस मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

  3. तयार पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

  4. काही मिनिटे तसेच राहू द्या.

  5. नंतर हातांवर पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा.

या फेसपॅकमुळे डेड स्किन दूर होते, त्वचा उजळते, डार्क स्पॉट्स कमी होतात आणि चेहरा नैसर्गिकरित्या तेजस्वी दिसतो. बटाटा आणि तांदळाचा नैसर्गिक फेसपॅक नियमित वापरल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचा अधिक निरोगी व चमकदार होते.

(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती