लाईफस्टाईल

सतत घाम येतो का? घाम कमी येण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय

तुम्हालाही घामाचा त्रास असेल तर घाम कमी येण्यासाठी करा काही घरगुती उपाय

Rutuja Karpe

तुम्हालाही घामाचा खूपच त्रास होत आहे का? कपडे बदलले किंवा महीलांनी थोडाफार मेकअप केला, की लगेचंच घाम येयला लागतो. चारचौघात सतत घाम आलेला आपल्यालाही अजिबातचं आवडणार नाही, नाही का? तुम्हालाही घामाचा त्रास असेल तर तुम्ही घाम कमी येण्यासाठी काही घरगुती उपाय करु शकता.

घाम का येतो?

घाम शरीराचे तापमान योग्य ठेवण्यास मदत करतो. शरीरात असलेल्या घामग्रंथीमधून हा घाम उत्सर्जित होत असतो. उन्हाळ्याच्या कालावधीत घाम येणे अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे. पण जर तुम्हाला सतत घाम येत असेल तर ती तुमच्या शरीरासाठी मोठी समस्या आहे. हल्ली ऑपरेशन करुन या घामाच्या ग्रंथी काढल्या जातात. पण यावर काही घरगुती आणि सोपे इलाजही आहेत.

घाम कमी येण्यासाठी घरगुती उपाय

*लिंबू आणि मीठ

लिंबाचा रस आणि मीठही तुमचा घाम कमी करु शकतो. लिंबू आणि मीठ एकत्र करुन तुम्हाला घाम येणाऱ्या भागी चोळायचे आहे. असे करत असताना तुमचा शरीराचा तो भाग स्वच्छ असायला हवा. लिंबू आणि मिठाचे मिश्रण कमालीचे काम करते.

*कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा

घाम कमी करण्यासाठी आणखी एक इलाज अगदी हमखास सांगितला जातो. तो म्हणजे कॉर्नस्टार्ज आणि बेकिंग सोडा यांचा. या दोन्ही गोष्टींमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. बेकिंग सोडामध्ये असलेले अल्केलाईन हे घामातील बॅक्टेरीयाला आकर्षित करतात. त्यामुळे तुम्ही रोज रात्री हे मिश्रण तुमच्या काखेला किंवा घाम येणाऱ्या भागी लावा. फक्त 30 मिनिटे ठेवून आठवणीने धुवून टाका. जर ते जास्त कालावधीसाठी राहिले तर मात्र तुम्हाला अन्य त्रास होण्याची शक्यता आहे.

*टोमॅटोचा रस

टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक फायदा हा घामाशी संबंधित देखील आहे. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर तुम्ही टोमॅटोचा रस पिऊ शकता. जर टोमॅटोचा रस तुम्हाला प्यावा असे वाटत नसेल तर तुम्ही काखेत अथवा घाम येणाऱ्या ठिकाणी अगदी 10 मिनिटांसाठी हा रस लावू शकता.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

हरयाणा, गोवा, लडाखला मिळाले नवे राज्यपाल

बोइंगच्या विमानांचे ‘फ्यूएल स्वीच’ तपासा; DGCA चे आदेश