१० मिनिटांत बनवा कणीक-बटाट्याचे हेल्दी पॅनकेक! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होतील खुश 
लाईफस्टाईल

१० मिनिटांत बनवा कणीक-बटाट्याचे हेल्दी पॅनकेक! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होतील खुश

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, कणीक आणि बटाट्यापासून बनणारे हे झटपट पॅनकेक प्रत्येकवेळी बेस्ट ठरतात. कमी वेळ, कमी मेहनत आणि भरपूर चव - अशा या रेसिपीमुळं घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच चेहरे उजळतात.

Mayuri Gawade

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, कणीक आणि बटाट्यापासून बनणारे हे झटपट पॅनकेक प्रत्येकवेळी बेस्ट ठरतात. कमी वेळ, कमी मेहनत आणि भरपूर चव - अशा या रेसिपीमुळं घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच चेहरे उजळतात. पौष्टिक, पोटभरीचा आणि अगदी १० मिनिटांत तयार होणारा हा हेल्दी पर्याय तुम्हालाही नक्की आवडेल!

साहित्य :

  • २ उकडलेले बटाटे

  • १ कप गव्हाची कणीक / मैदा

  • २ गाजरे (किसलेले)

  • १ कांदा (बारीक चिरलेला)

  • २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • १ टीस्पून गरम मसाला

  • १ टीस्पून धणे पावडर

  • १ टीस्पून जिरे

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • १ टीस्पून लसूण-आले बारीक चिरलेले

  • ½ टीस्पून लाल तिखट

  • ३ कप पाणी

  • चवीनुसार मीठ

  • तेल

कृती :

सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. त्यात किसलेले गाजर आणि बारीक चिरलेला कांदा घाला. नंतर हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण-आले, गरम मसाला, धणे पावडर, जिरे, लाल तिखट आणि मीठ मिसळून चांगले एकजीव करा. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पिठ तयार करा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यात तेल टाका आणि पिठ तव्यावर पसरवा. त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा, थोड्या वेळाने केक पलटी करा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.

तयार झालेले गरमागरम पॅनकेक आवडत्या चटणी किंवा केचपसोबत सर्व्ह करा.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके