चटपटीत खायची इच्छा होतेय? मग 'ही' क्रिस्पी मटार कचोरी नक्की ट्राय करा

तुम्हीही त्यातलेच आहात का? ज्यांना संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत, कुरकुरीत खायची इच्छा होते? पण दररोज नवनवीन पदार्थ काय करायचे, हा प्रश्न आपल्या डोक्यात असतोच. काही वेळा हलके स्नॅक्स किंवा कुरकुरीत खाण्याचीही इच्छा होते, पण कचोरी, शेवपूरी असे पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. अशा वेळेस गरमागरम, मसालेदार मटार कचोरी ट्राय करा.
चटपटीत खायची इच्छा होतेय? मग 'ही' क्रिस्पी मटार कचोरी नक्की ट्राय करा
चटपटीत खायची इच्छा होतेय? मग 'ही' क्रिस्पी मटार कचोरी नक्की ट्राय करा
Published on

तुम्हीही त्यातलेच आहात का? ज्यांना संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत, कुरकुरीत खायची इच्छा होते? पण दररोज नवनवीन पदार्थ काय करायचे, हा प्रश्न आपल्या डोक्यात असतोच. काही वेळा हलके स्नॅक्स किंवा कुरकुरीत खाण्याचीही इच्छा होते, पण कचोरी, शेवपूरी असे पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. अशा वेळेस गरमागरम, मसालेदार मटार कचोरी ट्राय करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून चटपटीत! ही कचोरी संध्याकाळच्या चहा सोबत स्नॅक्स म्हणून परफेक्ट आहे. चला तर मग, मटार कचोरी कशी बनवायची ते पाहूया...

चटपटीत खायची इच्छा होतेय? मग 'ही' क्रिस्पी मटार कचोरी नक्की ट्राय करा
घरात पार्टी प्लॅन केलीये? मग स्नॅक्समध्ये हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा!

साहित्य :

  • मैदा - २ कप

  • रवा - १ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - २ टेबलस्पून (मोईनसाठी)

  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • हिरवे मटार - १ कप (उकडलेले किंवा थोडेसे कुस्करलेले)

  • हिरवी मिरची - २ (बारीक चिरून)

  • आले-पेस्ट - ½ टीस्पून

  • बारीक चिरलेली कोथिंबीर -

  • जिरे - ½ टीस्पून

  • हिंग - चिमूटभर

  • लाल तिखट - ½ टीस्पून

  • गरम मसाला - ¼ टीस्पून

  • धने पावडर - ½ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - (तळण्यासाठी)

कृती :

सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, रवा, मीठ आणि मोईनसाठी तेल घालून छान एकत्र मिसळा. नंतर थोडं-थोडं पाणी घालत मऊ पण घट्टसर पीठ मळून घ्या आणि ते १० मिनिटे झाकून बाजूला ठेवा. आता सारण तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग टाका. त्यानंतर हिरवी मिरची आणि आले-पेस्ट घालून छान परता. लगेच त्यात उकडलेले किंवा किंचित मॅश केलेले मटार घालून मिसळा आणि त्यात लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण चांगलं परतून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून हे सारण थंड होऊ द्या.

पीठ तयार झाल्यावर त्याचे छोटे गोळे करा, प्रत्येक गोळी थोडी लाटून त्यात मटारचे सारण भरा आणि किनारी नीट बंद करून गोलाकार कचोरीचा आकार द्या. गरम तेलात हे कचोर्‍या मध्यम आचेवर हळूहळू तळा, जेणेकरून त्या बाहेरून खुसखुशीत आणि आतून चांगल्या शिजतील. सोनेरी रंग आल्यावर कचोर्‍या बाहेर काढा आणि गरमागरम चहा, चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

चटपटीत खायची इच्छा होतेय? मग 'ही' क्रिस्पी मटार कचोरी नक्की ट्राय करा
रोजचे पोहे-उपमा सोडा; मुलांसाठी नाश्त्यात बनवा चवदार स्प्रिंग रोल्स!

सर्व्हिंग टिप्स

  • गरमागरम सर्व्ह केल्यावर कचोरी जास्त कुरकुरीत लागते.

  • हिरवी चटणी किंवा चिंच-गोड चटणीसोबत सर्व्ह करा.

  • चहा वेळेसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन.

  • वरून चिमूटभर चाट मसाला शिंपडा – चव दुप्पट!

  • मिनी कचोरी बनवून पार्टी स्नॅक्स म्हणूनही देऊ शकता.

logo
marathi.freepressjournal.in