Freepik
लाईफस्टाईल

Eye Care: मोफत मोतीबिंदू तपासणी करायची आहे? मग ही बातमी वाचाच!

Tejashree Gaikwad

Dr Agarwals Eye Hospital: जागतिक स्तरावर, मोतीबिंदू हे अंधत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक असून जगभर अंदाजे १८ मिलियन लोक या विकाराने ग्रस्त आहेत. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अंधत्वामागील हे एक प्रमुख कारण आहे. मोतीबिंदूशी संबंधित सर्व शस्त्रक्रियांपैकी २०% मधुमेहाच्या रुग्णांवर केल्या जातात असा क्लिनिकल अभ्यासाचा अंदाज आहे.

या जून महिन्यात मोतीबिंदू जनजागृती महिन्याच्या निमित्ताने डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल मुंबईतील ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या रहिवाशांसाठी शहरातील सर्व शाखांमध्ये ३० जून २०२४ पर्यंत मोफत मोतीबिंदू तपासणी व सल्ला आयोजित करत आहे.

डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या चीफ स्ट्रेटेजी ऑफिसर डॉ. वंदना जैन यांनी मोतीबिंदू आणि त्याची लक्षणे समजून घेण्याच्या महत्त्वावर भर देत सांगितले की, मोतीबिंदूचा दृष्टीवर लक्षणीय प्रभाव पडू शकतो. दैनंदिन क्रियाकलाप आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. अस्पष्ट दृष्टी, कमी प्रकाशात पाहण्यास त्रास होणे आणि चमकण्याची संवेदनशीलता वाढणे यासारखी लक्षणे मोतीबिंदू निर्मितीचे सूचक आहेत. वयाशी संबंधित मोतीबिंदू सर्वात सामान्य असले तरी, अतिनील किरणांचा संपर्क, निर्जलीकरण, अस्वास्थ्यकर आहार, धूम्रपान, डोळ्यांना दुखापत, मधुमेह आणि किरणोत्सर्ग उपचारांसारख्या वैद्यकीय परिस्थितींमुळे ते कोणत्याही वयोगटात होऊ शकतात. व्यक्ती, विशेषतः ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी ही चिन्हे ओळखणे आणि पुढील दृष्टीदोष टाळण्यासाठी वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप घेणे महत्त्वाचे आहे".

मोतीबिंदू प्रतिबंधावरील उपचार आणि उपायांबद्दल बोलताना, डॉ. जैन म्हणाल्या, "सुदैवाने, मोतीबिंदूवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात, जिथे क्लाऊडी लेन्सच्या जागी कृत्रिम लेन्स बसवली जाते. तंत्रज्ञान आणि त्यातील प्रगतीमुळे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित बनली आहे, ज्यामुळे रुग्णांची दृष्टी परत आणल्याने त्यांना जीवनाचा सुधारित दर्जा मिळतो. याव्यतिरिक्त, निरोगी संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करणे, मद्यपान आणि धूम्रपान सोडणे यामुळे दीर्घकाळ स्पष्ट दृष्टीसह दीर्घायुष्य मिळू शकते आणि असंसर्गजन्य रोग टाळता येतात. त्यामुळे, योग्य परिणाम साध्य करण्यासाठी लवकर निदान आणि त्वरित उपचार ही गुरुकिल्ली आहे.”

डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलतर्फे मुंबईतील सर्व १४ शाखा आणि क्लिनिकमध्ये ३० जून २०२४ पर्यंत मोतीबिंदूविषयक मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे.

नोंदणीसाठी संपर्कः 9594586999

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस