लाईफस्टाईल

काळ्या मिरीचा काढा प्या; वारंवार येणाऱ्या सर्दी, ताप, खोकल्यापासून होते सूटका

आयुर्वेदानुसार काही औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी एकत्र पाण्यात उकळवून त्याचा काढा बनवला तर ते रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम उपाय ठरतात.

Rutuja Karpe

बदलते वातावरण प्रदुषण यामुळे अनेक जण आजारी पडतात लहानां पासून मोठ्यान पर्यंत सर्वानाच ऋतुमाना नुसार सर्दी, खोकला, ताप व साथीचे आजार होत असतात. त्याला मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे. आयुर्वेदा नुसार काही औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी एकत्र पाण्यात उकळवून त्याचा काढा बनवला तर ते रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम उपाय ठरतात. तर आज आपण एक आयुर्वेदीक काढा कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत. खाली दिलेली काढा बनवण्याची कृती ही एका कपाला व एका वेळेसाठीचे प्रमाण आहे. 

साहित्य : २ कप पाणी, पाव चमचा सुंठ पावडर किंवा १ इंच आलं वापरल तरी चालेल, ५-६ काळी मिरी दाणे, एक वेलदोडा / वेलची, १ इंच दालचिनी, १ लवंग, पाव चमचा हळद, खडी साखर किंवा शुध्द गूळ चवीनुसार.

गुणधर्म : ह्या काढ्यात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया. 

यातील सुंठ पावडर ही पोटदुखी, पोटात मळमळणे, पोटातील गॅस बाहेर काढणे व चयापचन सुधारण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. आलं सर्दी खोकला घश्यातील अडकलेला कफ बाहेर काढण्यासाठी खुपच उपयुक्त आहे. 

यातील काळी मिरी मुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठ प्रतिबंधक, श्वसन रोग, सांधेदुखी, केसांच्या समस्या, त्वचेच्या समस्या यांवर गुणकारी. हळद व मिरी यांच्या एकत्रित वापरानं कर्करोगास (कॅन्सर) प्रतिबंध करते.

यातील वेलदोडा / वेलची / इलायची ही अँटीऑक्सिडेन्ट आहे. रक्त दाब कमी करण्यासाठी उपयुक्त,  अँटी इंफ्लामेंटरी तत्व यात आहेत. पचन क्रिया सुधारते. तोंडाची दुर्गंधी घालवते व तोंडातील किटाणू पासून व बॅक्टेरियाच्या वाढी पासून सौरक्षण मिळते. रक्त दाब कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

यातील लवंग सेवनाने रोगप्रतिकार शक्ती सुधारते. खोकल्याची ढास थांबवण्यासाठी, सांधे दुखी, दात दुखी, तोंडाची दुर्गंधी पोटातील मळमळ थांबवण्या साठी उपयुक्त. 

हळद खडीसाखर व गुळाचे फायदे वरील मुद्यात विस्तृतपणे दिले आहेत. 

कृती : आधी दोन कप पाणी गरम करत ठेवा. नंतर त्यात पाव चमचा सुंठ पावडर टाकावे. नंतर ५-६ काळी मिरी दाणे कुटून भरड करून त्या पाण्यात टाकावी. त्यानंतर एक वेलदोडा सोलून त्यातील दाणे कुटून भरड करून त्या पाण्यात टाकावी. लवंग तोडून पाण्यात टाकावी. नंतर पाव चमचा हळद व चवी नुसार खडी साखर किंवा शुध्द गूळ घालावा. हे मिश्रण चांगले उकळून एक कप उरेल इतके आटू द्यावे. हा काढा गाळून कपात/ग्लास मध्ये ओतावे.(काळी मिरी, वेलची, लवंग व खडीसाखर एकत्र कुटून वापरले तर जास्त सोयीचं होईल.)  

हा तयार झालेला काढा गरम असतानाच घोट घोट प्यावा. हा उपाय दिवसभरात कधीही करून चालतो. ज्यांना मधुमेह आहे अश्या व्यक्तींनी साखर वापरू नये.   

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?