लाईफस्टाईल

फळांचा एकत्रित ज्यूस पिणे शरीरासाठी नुकसानदायक!

वेगवेगळ्या फळांना एकत्रित करून त्यांचा रस सेवन केल्याने बरेचसे नुकसान होतात. एकत्रित फळांचा रस सेवन केल्यास होणारे काय तोटे होतोत जाणून घ्या.

Rutuja Karpe

शरीरासाठी फळांचे सेवन हे खुप फायदेशीर ठरते, काही लोकं फळांमध्ये असलेल्या विटामिन्स अधिक प्रमाणात मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रसांना एकत्रित करतात आणि मिक्स फ्रूट ज्यूसचे सेवन करतात. मात्र, वेगवेगळ्या फळांना एकत्रित करून त्यांचा रस सेवन केल्याने बरेचसे नुकसान होतात. एकत्रित फळांचा रस सेवन केल्यास होणारे काय तोटे होतोत जाणून घ्या.

पोषक तत्वांचे नुकसान

वेगवेगळ्या फळांचा एकत्रित रस मिक्स केल्याने सगळ्या फळांचे न्यूट्रिएंट्समध्ये बदल होऊ शकतो. काही फळांमध्ये एंजाइम किंवा कंपाउंड असू शकतात. जे दुसऱ्यांसोबत मिसळल्यावर चांगल्या प्रकारचे परिणाम देणार नाहीत यामुळे शरीराला नुकसान होईल.

पाचन संस्थेत समस्या

काही फळांचा रस एकत्रित करून सेवन केल्याने पाचन संबंधी समस्या निर्माण होतात जसे की गॅस , सूज, उचकी, बद्धकोष्टता या समस्या येऊ शकतात. विशेष:ता आंबट फळांचा रस दुसऱ्या फळांसोबत मिक्स केला गेला तर त्यातील आम्ल घटक पाचन संस्थेला प्रभावित करू शकतात.

असंतुलित पोषक तत्व

फळांच्या रसाला एकत्रित सेवन केल्याने त्यातील न्यूट्रिएंट्स असंतुलित होऊ शकतात. कारण यासाठी की काही फळांमध्ये विटयामिन, खनिज किंवा साखरेचे प्रमाण अधिक असते. जर सावधानी बाळगली नाही तर यामुळे पूर्ण शरीरावर नकरात्मक प्रभाव पडेल.

ब्लड शुगर पातळीत चढ़-उतार

काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण ज्यास्त प्रमाणात असते. अशात जर सर्व फळांचा एकत्रित रस सेवन केल तर, ब्लड शुगर पातळीत लवकर वाढ होऊ शकते. हे चिंतेचे कारण ठरू शकते. विशेष करून ज्यांना डायबिटीज आहे त्यांना समस्या येऊ शकते. याकरिता प्रयत्न करा की प्रत्येक फळाचा रस वेगवेगळा सेवन करणे.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

"त्यांच्या काही शंका असतील तर..."; राज ठाकरेंच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंचा मोठा निर्णय; e-KYC मध्ये चूक झाली असेल तर...

Lionel Messi's India Tour 2025: पुतळ्याचे अनावरण, स्टेडियममध्ये राडा; कोलकात्यानंतर मेस्सी कुठे अन् कोणाला भेटणार? जाणून घ्या मेस्सीचा संपूर्ण भारत दौरा

कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेल्याने मेस्सीच्या चाहत्यांचा उद्रेक; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा माफीनामा, म्हणाल्या...

Messi Viral Video : मेस्सी आला आणि १० मिनिटांत निघून गेला...; फुटबॉलपटूच्या क्षणिक एन्ट्रीने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांचा राडा