(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

सकाळच्या नाश्त्यासाठी सोपा पर्याय; घरातला ब्रेड वापरून करा झटपट उपमा, वाचा रेसिपी

घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून केवळ ८ ते १० मिनिटांत ही रेसिपी तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ चहा किंवा कॉफीसोबत अधिक स्वादिष्ट लागतो.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळच्या घाईत झटपट आणि चविष्ट नाश्ता हवा असेल, तर ब्रेड उपमा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून केवळ ८ ते १० मिनिटांत ही रेसिपी तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ चहा किंवा कॉफीसोबत अधिक स्वादिष्ट लागतो.

साहित्य (२ जणांसाठी) :

  • ब्रेड स्लाइस - ६

  • कांदा - १ (बारीक चिरलेला)

  • टोमॅटो - १ (बारीक चिरलेला)

  • हिरवी मिरची - १

  • मोहरी - अर्धा टीस्पून

  • हळद - पाव टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - २ टीस्पून

  • कोथिंबीर - थोडी

  • लिंबू - ऐच्छिक

कृती :

सुरुवातीला ब्रेड हलके गरम करून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिरवी मिरची आणि कांदा घालून हलके सोनेरी होईपर्यंत परतवा. त्यानंतर टोमॅटो घालून एक मिनिट मऊ होईपर्यंत शिजू द्या. यानंतर हळद आणि मीठ घालून मिश्रण हलकेसे ढवळा. आता ब्रेडचे तुकडे घालून २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने मिसळा, जेणेकरून ब्रेड मसाल्यात चांगला मुरेल. गॅस बंद करून वरून कोथिंबीर आणि इच्छेनुसार लिंबूरस घाला. गरमागरम ब्रेड उपमा तयार!

टिप्स :

  • ब्रेड थोडा कोरडा किंवा एक दिवस जुना असेल, तर उपमा अधिक चविष्ट होतो.

  • हवे असल्यास शेंगदाणे किंवा मटार घालून चव वाढवू शकता.

  • मुलांसाठी थोडे बटर घातल्यास स्वाद अधिक वाढतो.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग