

व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी बाजारातून केक आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला केक अधिक खास ठरतो. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हा केक घरच्या घरी तयार करता येतो.
साहित्य :
मैदा - १ कप
साखर - पाऊण कप
दूध - अर्धा कप
तेल / वितळलेलं बटर - पाव कप
बेकिंग पावडर - १ टीस्पून
बेकिंग सोडा - पाव टीस्पून
कोको पावडर - २ टेबलस्पून (चॉकलेट केकसाठी)
व्हॅनिला एसेंस - १ टीस्पून
मीठ - चिमूटभर
कृती :
एका भांड्यात मैदा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घ्या. त्यात दूध आणि तेल घालून बॅटर गुळगुळीत होईपर्यंत नीट मिसळा. आता कोको पावडर किंवा व्हॅनिला एसेंस घालून हलक्या हाताने मिक्स करा. केक टिनला तेल लावून थोडा मैदा भुरभुरावा आणि त्यामध्ये बॅटर ओता. कुकरमध्ये मीठ घालून ५ मिनिटे कुकर गरम करा, त्यात टिन ठेवा आणि झाकणावरची शिट्टी काढा. मध्यम आचेवर ३०-३५ मिनिटे केक शिजवा. त्यानंतर टूथपिक घालून केक तपासा. टूथपिक कोरडी राहिली तर समजा केक तयार.
टिप्स :
बॅटर फार घट्ट किंवा फार पातळ करू नका.
कुकरमध्ये केक करताना शिट्टी लावू नका.
केक थंड झाल्यावरच सजावट करा.