Valentine Scam Alert: व्हॅलेंटाईनच्या नावाने सायबर फ्रॉड; एक क्लिक अन् बँक खाते होईल रिकामे, वाचा महत्त्वाची माहिती

व्हॅलेंटाईन वीकमध्ये Someone likes you किंवा You received a Valentine card अशा प्रकारचे मेसेज मोठ्या प्रमाणात येतात. या मेसेजमधील...
Valentine Scam Alert: व्हॅलेंटाईनच्या नावाने सायबर फ्रॉड; एक क्लिक अन् बँक खाते होईल रिकामे; वाचा महत्त्वाची माहिती
Valentine Scam Alert: व्हॅलेंटाईनच्या नावाने सायबर फ्रॉड; एक क्लिक अन् बँक खाते होईल रिकामे; वाचा महत्त्वाची माहिती'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week) सुरू होताच मोबाईलवर प्रेमाचे मेसेज, ई-कार्ड्स, सरप्राईज गिफ्ट आणि केक डिलिव्हरीचे कॉल वाढताना दिसतात. मात्र, हे सर्वच प्रकार खरे नसून अनेकदा यामागे सायबर फ्रॉडचा डाव लपलेला असतो. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा इशारा सरकारी यंत्रणा आणि सायबर सुरक्षा विभागाने दिला आहे.

अनेकजण आनंदाच्या भरात अनोळखी लिंकवर क्लिक करतात किंवा डिलिव्हरीच्या नावाखाली ओटीपी (OTP) शेअर करतात. एकदा लिंक उघडली किंवा फसवणूक करणाऱ्यांच्या सांगण्यानुसार प्रक्रिया केली, की मोबाईल आणि बँकेशी संबंधित महत्त्वाची माहिती त्यांच्या हाती जाते. त्यानंतर खात्यातील पैसे काढले जातात किंवा मोबाईलवर पूर्ण ताबा मिळवला जातो.

OTP किंवा बँक माहिती देऊ नका

कोणी फोन करून स्वतःला डिलिव्हरी एजंट, बँक कर्मचारी किंवा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून OTP, बँक तपशील किंवा फोनची सेटिंग बदलण्यास सांगितल्यास त्वरित फोन कट करावा. कोणतीही अधिकृत संस्था फोनवरून अशी माहिती मागत नाही, असे सायबर विभागाने स्पष्ट केले आहे.

Valentine Scam Alert: व्हॅलेंटाईनच्या नावाने सायबर फ्रॉड; एक क्लिक अन् बँक खाते होईल रिकामे; वाचा महत्त्वाची माहिती
Valentine's Week : Teddy Dayचा इतिहास काय? 'टेडी' नाव पडलं तरी कसं? जाणून घ्या महत्त्व

फसव्या लिंकपासून दूर राहण्याचा सल्ला

व्हॅलेंटाईन वीकमध्ये Someone likes you किंवा You received a Valentine card अशा प्रकारचे मेसेज मोठ्या प्रमाणात येतात. या मेसेजमधील लिंक बहुतेक वेळा बनावट असतात. अशा लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमध्ये व्हायरस जाऊ शकतो आणि वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.

Valentine Scam Alert: व्हॅलेंटाईनच्या नावाने सायबर फ्रॉड; एक क्लिक अन् बँक खाते होईल रिकामे; वाचा महत्त्वाची माहिती
दररोज थोडं चॉकलेट खाल्लं तर काय होतं? जाणून घ्या कारण

अनोळखी गिफ्ट, केक किंवा फुलांपासून सावध राहा

जर तुमच्या नावाने अचानक अनोळखी केक, फुले किंवा गिफ्ट आल्यास ते तात्काळ स्वीकारण्याची घाई करू नये. अनेकदा भामटे डिलिव्हरी एजंट बनून कॉल करतात आणि OTP देण्यास किंवा फोनमधील सेटिंग बदलण्यास सांगतात. कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यास बँकेकडून येणारे मेसेज आणि कॉल थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतात, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात गैर काहीच नाही, मात्र थोडी सजगता अत्यंत आवश्यक आहे.

  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

  • OTP किंवा बँक माहिती कुणालाही देऊ नका.

  • संशयास्पद गिफ्ट किंवा पार्सल आधी तपासा.

  • शंका असल्यास कुटुंबीयांशी किंवा पोलिसांशी संपर्क साधा.

Valentine Scam Alert: व्हॅलेंटाईनच्या नावाने सायबर फ्रॉड; एक क्लिक अन् बँक खाते होईल रिकामे; वाचा महत्त्वाची माहिती
Valentine's Week : फेब्रुवारीत प्रेमाचा उत्सव! कोणत्या दिवशी कोणता डे? वाचा एका क्लिकवर

थोडी जागरूकता आणि सतर्कता ठेवल्यास व्हॅलेंटाईन वीक आनंदात आणि सुरक्षितपणे साजरा करता येईल, असा सल्ला सायबर सुरक्षा विभागाने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in