उन्हाळ्यात शरीराला लगेच थंडावा हवा? झटपट तयार करा कोकम मॉकटेल 
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात शरीराला लगेच थंडावा हवा? झटपट तयार करा कोकम मॉकटेल

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी १० मिनिटांत बनवा चटपटीत कोकम मॉकटेल. पचन सुधारण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी हेल्दी घरगुती पेयाची सोपी रेसिपी.

Mayuri Gawade

कडक उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यानंतर थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होते. अनेकदा लोक थेट कोल्डड्रिंककडे वळतात, पण ते आरोग्यासाठी नेहमीच चांगले पर्याय नसतात. अशावेळी घरच्या घरी तयार केलेलं नैसर्गिक पेय शरीराला अधिक फायदेशीर ठरू शकतं. कोकमपासून बनवलेलं मॉकटेल हा त्यापैकीच एक चवदार आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

कोकममध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. याशिवाय पचन सुधारण्यास आणि पित्ताचा त्रास कमी करण्यासही हे पेय उपयोगी ठरू शकतं.

साहित्य

  • कोकम सिरप

  • मध

  • लिंबाचा रस

  • लिंबाची पाने

  • कोथिंबीर

  • तुळशीची पाने

  • लाल मिरची (चिमूटभर)

  • मीठ

  • सोडा

  • बर्फ

कृती

१. मसाला तयार करा
मिक्सरमध्ये लिंबाची पाने, कोथिंबीर, तुळस आणि लाल मिरची घालून हलकं वाटून घ्या.

२. मुख्य मिश्रण तयार करा
शेकरमध्ये कोकम सिरप, मध, लिंबाचा रस, बर्फ आणि तयार मसाला घालून चांगलं शेक करा.

३. ग्लास सजवा
ग्लासच्या कडांना लिंबाचा रस लावून मीठ आणि तिखटाच्या मिश्रणात डुबवा.

४. सर्व्ह करा
तयार मिश्रण गाळून ग्लासमध्ये घ्या आणि वरून सोडा घाला. पुदिन्याची पाने किंवा लिंबाच्या कापाने सजावट करा.

कोकम मॉकटेलचे फायदे

  • शरीराला त्वरित थंडावा मिळतो

  • पचनक्रिया सुधारण्यास मदत

  • पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो

  • नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स मिळतात

  • कोल्डड्रिंकला हेल्दी पर्याय

उन्हाळ्यासाठी परफेक्ट घरगुती पेय

कमी वेळात आणि सहज उपलब्ध साहित्यांत तयार होणारं कोकम मॉकटेल हे उन्हाळ्यासाठी उत्तम पेय ठरू शकतं. चव आणि आरोग्य यांचा समतोल राखणारा हा पर्याय एकदा नक्की करून पाहा.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड