लाईफस्टाईल

दररोज एकतरी रताळे खा आणि शरीर निरोगी ठेवा, रताळ्यात आहे 'हे' महत्त्वाचे घटक

रताळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रताळ्यामध्ये आरोग्याचा खजिना असतो.

Rutuja Karpe

चवीला अतिशय रुचकर लागणारे रताळे ही एक आयुर्वेदिक वनस्पती देखील आहे. काही लोकांना तर रताळ्याचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर रताळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रताळ्यामध्ये आरोग्याचा खजिना असतो. गोडसर चव आणि मलाईदार गर असं रताळं नारंगी, तपकिरी आणि जांभळ्या रंगांचं असतचं. उकडलेलं रताळं खाणं आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. नियमितपणे उकडलेलं रताळं खाल्ल्यास आरोग्यासाठी भरपूर फायदे होतात.

  1. रताळे खाण्याचे फायदे

    रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात मिळतात. रताळं पोषक तत्वांनी समृद्ध असते. रताळ्याचं सेवन केल्याने आरोग्यासाठी खूप फायदा मिळतो.

  2. पचनक्रिया सुरळीत होईल

    रताळ्याचं सेवन केल्याने पचन व्यवस्थित होतं. रताळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करणं सोपे होतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रताळ्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

  3. रोगप्रतिकारशक्ती वाढते

    शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे रताळे खाल्ले तर सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा धोका कमी होईल. 

  4. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

    रताळं हृदयाचं आरोग्य सुधाण्याचे काम करतं. हृदयासंबंधित आजार दूर ठेवण्यासाठी रताळ्यांचं सेवन केलं जातं. रताळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, त्यामूळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  5. वजन नियंत्रित राखण्यास मदत

    रताळं कमी उष्मांक आणि उच्च फायबरयुक्त आहे. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्हाला जास्त खाण्याच्या सवयीपासून दूर करते आणि यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

वैद्यकीय प्रवेश निकालाचा घोळ न्यायालयात; सरकारला भूमिका मांडण्याचे निर्देश; सुनावणी आता १३ नोव्हेंबरला