लाईफस्टाईल

तुम्ही पनीर योग्य प्रकारे खाताय ना?, पनीर खाताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या!

आपल्या आहारात पनीर समाविष्ट करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Rutuja Karpe

दैनंदिन आहारात पनीर असणे अतिशय लाभदायी मानले जाते. जे मांसाहार करत नाही त्यांच्यासाठी पनीर खावे. पनीर प्रथिने मोठ्याप्रमाणात असतात. पनीर शरीराच्या आरोग्यासह त्वचेच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. पण, पनीरचे योग्य प्रकारे सेवन करणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार, दुधापासून बनवले जाणारे ताक या एकमेव पदार्थाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दुग्धजन्य पदार्थात मीठ वर्ज्य करावं. कारण, दुधात मीठ मिसळल्यास शरीराची हानी होते. सध्या बाजारात पनीर आणि पनीरपासून बनणाऱ्या विविध पदार्थांना मोठी मागणी आहे. यामुळे आपल्या आहारात पनीर समाविष्ट करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हि काळजी घेतल्यास पनीर खाणे आपले तारुण्य टिकवण्यासाठी मदत करते.

१) चांगल्या त्वचेसाठी पनीरसोबत काळीमिरी पूड, धणेपूड वा चाटमसाला टाकून खा. पण, मिठ वापरू नका. दररोज एक छोटी वाटी (१०० ग्रॅम) पनीर खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. दिवसभरात कधीही पनिर खाल्ले तरी चालेल, पण रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी १ तास आधी ते खा.

२) पनीर कॅल्शियम जास्त असते. यामुळे त्वचा आणि केसांसाठी ते उपयुक्त आहे. शिवाय पनीर खाल्ल्याने शरीरातील फॅट अजिबात वाढवत नाही. याउलट हाडं तसंच सांधे बराच काळ सुस्थितीत राहतात. यामुळे दैनंदिन आहारात आठवड्यातून किमान २ वेळा पनीरचा समावेश करावा.

३) पनीर खाल्ल्याने त्वचेचा घट्टपणा टिकून राहतो. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. सुरकुत्या पडू नयेत यासाठी शरीराला कॅल्शियम आणि प्रथिनांची गरज असते आणि हि गरज पनीर पूर्ण करते.

४) पनीर चेहऱ्याची चमक वाढवते. कारण, यातील प्रथिने त्वचेच्या नवीन कोशिकांना निर्माण करतात आणि जुन्या कोशिकांना दुरुस्त करतात.

५) पनीरमध्ये असलेल्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. यामुळे पनीर खाल्ल्यास त्वचेचा चमकदारपणा टिकून राहतो. शिवाय त्वचेचे नुकसानदेखील भरून काढण्यासाठी पनीर मदत करते.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील 'हेल्दी' संबंध संपले; भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची खंत

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण : पार्थ पवार यांच्या सहीचे बनावट पत्र व्हायरल; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल; शनिवारी ६० टक्के मतदान