Sheetala Saptami 2025 (FPJ)
लाईफस्टाईल

Sheetala Saptami 2025: शीतलामातेची पूजा का करतात? जाणून घ्या पूजा विधी, योग्य सामग्री आणि काय आहे महत्त्व

शीतलामाता पूजन हा हिंदू धर्मात उन्हाळ्यातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार उन्हाळ्यातील किंवा अन्य संसर्गजन्य रोग आणि आजार होऊ नये यासाठी शीतलामातेची पूजा केली जाते. शीतलामाता सर्व रोगांपासून बचाव करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ही पूजा होळीनंतरच्या सप्तमी किंवा अष्टमीला केली जाते. (Sheetala Saptami 2025) याला शीतला सप्तमी आणि शीतला अष्टमी, असे म्हणतात.

Kkhushi Niramish

शीतलामाता पूजन हा हिंदू धर्मात उन्हाळ्यातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार उन्हाळ्यातील किंवा अन्य संसर्गजन्य रोग आणि आजार होऊ नये यासाठी शीतलामातेची पूजा केली जाते. शीतलामाता सर्व रोगांपासून बचाव करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ही पूजा होळीनंतरच्या सप्तमी किंवा अष्टमीला केली जाते. (Sheetala Saptami 2025) याला शीतला सप्तमी आणि शीतला अष्टमी, असे म्हणतात. यावर्षी हा सण आज शुक्रवारी (दि. २१) आणि शनिवारी (दि.२२) रोजी साजरा केला जात आहे.

शीतला सप्तमी प्रामुख्याने भारतातील उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये, विशेषतः राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये प्रामुख्याने साजरी केली जाते. तर महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः अहिल्यानगर जिल्हा, मराठवाडा या भागात ही पूजा (Sheetala Saptami 2025) भक्तीभावाने केली जाते. या शुभ दिवशी, खाली वर्णन केल्याप्रमाणे, सणाचे महत्त्व, विधी आणि अधिक तपशील जाणून घेऊया.

शीतला सप्तमी किंवा अष्टमीला का पूजा करतात (Sheetala Saptami 2025) ?

शीतला सप्तमी किंवा अष्टमीला बासोदा पूजा असेही म्हणतात. संस्कृतमध्ये,"शीतला" म्हणजे "थंड करणारी", असा अर्थ होतो. त्यावरून मराठीत शीतला देवी, असे म्हटले जाते. वेगवेगळ्या प्रदेशात शीतला देवीची पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. स्कंद पुराणात, शीतलामातेचे वाहन गाढवी हे आहे. ती हातात भांडे, कडुलिंबाची पाने, चाळणी आणि झाडू धरते. काही हिंदू दंतकथेनुसार, शितळा देवी चेचक किंवा कांजिण्यासारखे आजार देखील बरे करते.

शीतला सप्तमी आणि अष्टमी 2025 (Sheetala Saptami 2025): तिथी आणि मुहूर्त

होळी सणानंतर येणाऱ्या सप्तमी किंवा अष्टमीला ही पूजा केली जाते तर पूर्णिमांत मास पद्धतीनुसार चैत्र महिन्यात ही पूजा केली जाते. तर अमावास्येने प्रारंभ होणाऱ्या महिन्यानुसार, फाल्गून महिन्याच्या दुसऱ्या पक्षातील म्हणजेच होळीनंतरच्या सप्तमी किंवा अष्टमीला ही पूजा केली जाते. काही भागात होळी सणानंतर सलग आठ ते नऊ दिवस शीतलामाता पूजन केले जाते.

शीतला सप्तमी तारीख: २१ मार्च २०२५

सप्तमी तिथी सुरू होते: २१ मार्च २०२५ रोजी पहाटे ०२:४५

शीतला अष्टमी: शनिवार, २२ मार्च २०२५

अष्टमी तिथी सुरू होते: २२ मार्च २०२५ रोजी पहाटे ०४:२३

अष्टमी तिथी संपते: २३ मार्च २०२५ रोजी पहाटे ०५:२३

शीतला सप्तमीचे व्रत आणि पूजा विधी कसे करतात

या दिवशी, भाविकांनी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे. त्यानंतर, त्यांनी देवी शीतला मातेच्या मंदिरांना भेट देऊन देवीची पूजा करावी. परंपरेनुसार, या दिवशी कोणतेही ताजे अन्न तयार केले जात नाही आणि भाविकांनी आदल्या दिवशी तयार केलेले अन्न सेवन करायचे असते. या दिवशी, भाविकांनी देवाला मोहरी, थंड पाणी आणि दूध अर्पण करावे.

नैवैद्य काय असतो?

या पूजेसाठी गोड भात आणि दही हा विशेष नैवेद्य केला जातो. हा गोड भात आदल्या दिवशी रात्रीच बनवून ठेवला जातो.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video