Freepik
लाईफस्टाईल

शाकाहारी लोकांसाठी 'या' भाज्या आहेत प्रोटिनचा उत्तम स्रोत; अन्य पोषक तत्वांचाही खजाना

शाकाहारी लोकांसाठी इथे काही भाज्यांची माहिती आहे ज्यामधून प्रोटीनचा मोठा स्रोत उपलब्ध होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्यांमधून प्रोटीन आणि अन्य पोषक तत्वांची उणीव पूर्ण होईल.

Kkhushi Niramish

प्रोटिन हे त्वचा, केस यासह शरीराच्या एकूणच आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. आजकाल धावपळीची जीवनशैली, बाहेरचे जेवण, चटपटीत आणि चमचमीत पदार्थ इत्यादींमुळे अनेकांना प्रोटीनच्या कमतरतेची समस्या निर्माण होत असते. प्रोटीन हे शक्यतो मांसाहारी पदार्थातून मुबलक प्रमाणात मिळते. मात्र, शाकाहारी लोकांना प्रोटीनची कमतरता जाणवल्यास ही उणीव कशी भरून काढायची, असा प्रश्न असतो. शाकाहारी लोकांसाठी इथे काही भाज्यांची माहिती आहे ज्यामधून प्रोटीनचा मोठा स्रोत उपलब्ध होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्यांमधून प्रोटीन आणि अन्य पोषक तत्वांची उणीव पूर्ण होईल.

वाटाणा

वाटाण्यात उच्च मात्रेत प्रोटिन असते. विशेष करून हिरव्या वाटाण्यात याचे प्रमाण खूप जास्त असते. ताज्या वाटाण्याच्या कोवळ्या दाण्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण होईल. कोवळा वाटाणा जास्तीत जास्त खाल्ल्याने प्रोटीनसह कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम देखील मिळेल. जे आरोग्यासाठी चांगले असते. वाटाणे खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते.

स्वीट कॉर्न

स्वीट कॉर्नमध्येही प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. त्यात फायबर देखील असते जे पोटासाठी चांगले असते. प्रोटीन मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हे समाविष्ट करू शकता. तुम्ही ते उकळून खाऊ शकता किंवा त्याचे सूप बनवूनही पिऊ शकता. तसेच नाश्त्यासाठी तुम्ही याची चटपटीत भेळही बनवू शकता. स्वीट कॉर्नची चटपटीत भेळ स्वादिष्ट तर लागतेच सोबतच प्रथिनांची कमतरताही पूर्ण करते.

ब्रोकोली

ब्रोकोली ही फ्लॉवर सारखी दिसणारी भाजी आहे. अलिकडे मार्केटमध्ये ही मोठ्या प्रमाणात येत आहे. प्रोटीन किंवा प्रथिनांनी समृद्ध असलेली ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतींनी करता येते. ती खाण्यासाठी रुचकरही लागते. त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत. हे आरोग्यासाठी चांगले आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video