Summer Special : फॉरेस्ट फ्रूट मिल्कशेक; टेस्टी आणि हेल्दी ड्रिंक, ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Special : फॉरेस्ट फ्रूट मिल्कशेक; टेस्टी आणि हेल्दी ड्रिंक, ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय

केळी, बेरीज, दही आणि दूध वापरून मिनिटांत तयार होणारा हा पौष्टिक ड्रिंक ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय आहे. उन्हाळ्यातील थंडगार आणि हेल्दी फॉरेस्ट फ्रूट मिल्कशेक रेसिपी जाणून घ्या.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात थंड, चविष्ट आणि पौष्टिक पेयाची गरज सगळ्यांनाच भासते. सकाळच्या घाईत झटपट तयार होणारा आणि शरीराला ऊर्जा देणारा असा हेल्दी पर्याय म्हणजे 'फॉरेस्ट फ्रूट मिल्कशेक'. फक्त काही मिनिटांत तयार होणारा हा मिल्कशेक तुमच्या ब्रेकफास्टसाठी परफेक्ट आहे. फळांचा नैसर्गिक गोडवा, दही आणि दुधामुळे मिळणारे पोषणमूल्य यामुळे हे ड्रिंक फळांच्या गरजाही पूर्ण करण्यात मदत करते.

साहित्य :

  • केळी (सोलून कापलेले) - १ किंवा २

  • फ्रोजन समर बेरीज / फॉरेस्ट फ्रूट्स - १५० ग्रॅम

  • लो-फॅट नॅचरल दही - १५० ग्रॅम

  • १% फॅट दूध - ७५० मिली

कृती :

सर्वप्रथम केळाचे तुकडे करून मिक्सरमध्ये टाका. त्यात फ्रोजन फॉरेस्ट फ्रूट्स (थेट फ्रिजमधून) घाला. आता त्यात लो-फॅट दही आणि दूध घालून मिक्सर सुरु करा. जोपर्यंत मिश्रण स्मूद होत नाही तोपर्यंत १५ ते २० सेकंद चांगले ब्लेंड करा. तयार मिल्कशेक ग्लासमध्ये ओता आणि थंडगार सर्व्ह करा.

टिप्स :

  • फॉरेस्ट फ्रूट्स नसतील तर रास्पबेरी किंवा मिक्स बेरीज वापरू शकता.

  • फळे थंड (फ्रोजन) वापरल्यास मिल्कशेक अधिक कूल आणि रिफ्रेशिंग लागतो.

  • ब्लेंडर नसल्यास हँड ब्लेंडर वापरूनही ही रेसिपी सहज बनवू शकता.

  • गोडी वाढवण्यासाठी हवे असल्यास थोडं मध किंवा खजूर घालू शकता.

  • अधिक हेल्दी बनवण्यासाठी लो-फॅट दूधच वापरा.

हा सोपा, झटपट आणि हेल्दी 'फॉरेस्ट फ्रूट मिल्कशेक' उन्हाळ्यात तुमच्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करा आणि दिवसाची सुरुवात फ्रेश आणि एनर्जेटिक पद्धतीने करा.

'विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त...'; राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत गोंधळ, कामकाज काही काळ ठप्प

CJP Protest : 'आक्षेपार्ह पोस्ट हटवा'; दिल्ली पोलिसांची X ला नोटीस

Mumbai : आक्षेपानंतरही सेव्हन हिल्सचा प्रस्ताव मंजूर; सुधार समितीत खासगीकरणाला विरोधकांचा विरोध

Mumbai : सत्ताधारी-विरोधकांच्या सेवेत महागड्या गाड्या; सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांना मिळणार नव्या कोऱ्या इनोव्हा

नवी मुंबईतील १२,६८७ अनधिकृत बांधकामांवर हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेचे पाऊल, नागरिकांना सतर्कतेचा इशारा