लाईफस्टाईल

Happy Friendship Day 2025 : नातं मैत्रीचं... तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणींना पाठवा हे खास मराठी शुभेच्छा संदेश आणि Quotes!

या फ्रेंडशिप डे ला भावना व्यक्त करा शब्दांतून, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा हे खास शुभेच्छा संदेश!

Mayuri Gawade

मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं.

ऑगस्टचा पहिला रविवार हा याच मैत्रीच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस. एकवेळ आपण वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला विसरू पण हा दिवस नाही. यावर्षी मित्रांना समर्पित हा खास दिवस ३ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर मैत्रीचा हा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही काही कोट्स आणि संदेश घेऊन आलो आहोत. जे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या खास दिवशी शेअर करू (Happy Friendship Day 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes) शकता.

> गाण्याला मैफलीची गरज असते

प्रेमाला हृदयाची गरज असते

दोस्तांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे

कारण मित्रांची गरज प्रत्येक क्षणाला असते

हॅपी फ्रेंडशिप डे !!!

................

> एकमेकांना भेटण्याची दोघांना आस आहे

आपल्या मैत्रीमध्ये काही तरी खास आहे

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

................

> नात्यातील माया कायम टिकून राहू दे,

आपली मैत्री अधिक घट्ट होऊ दे,

नवीन मित्रमैत्रिणी आयुष्यात भेटत राहतीलच

पण हा जुना मित्र कायम आठवणीत राहू दे

मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!!

................

> मैत्रीचा शोध घेतला जात नाही,

प्रत्येकासोबत मैत्रीचे नाते जोडले जात नाही,

आणि खास मित्रांचं आयुष्यातलं स्थान

कोणी हिरावून घेऊ शकत नाही

हॅपी फ्रेंडशिप डे !!!

................

> तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा

मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

................

> मैत्रीचं नातं लाखमोलाचं असते

प्रेमामध्ये मैत्रीचं नातं दुरावते

पण मैत्रीतील प्रेम कायम वाढतच जातं

हॅपी फ्रेंडशिप डे !!!

................

> अडचणीत कायम सोबत असतात मित्र

दुःख वाटून घेतात मित्र

रक्ताचं नात नसतानाही

आयुष्यभर साथ देतात मित्र

हॅपी फ्रेंडशिप डे !!!

................

> जीवन आहे तर आठवणी आहेत

आठवण आहे तर भावना आहेत

भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे….

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

................

> मित्र नेहमी स्तुती करणारे नसावेत

प्रसंगी आरशाप्रमाणे गुणदोष दाखवणारेही असावेत

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

................

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

महाराष्ट्राचे मॅक्सिम गॉर्की - अण्णाभाऊ साठे

आले मुखियाच्या मना...

पहलगामच्या हल्लेखोरांचा खात्मा? श्रीनगरमध्ये ऑपरेशन 'महादेव'; चकमकीत ३ दहशतवादी ठार

नागपूरच्या दिव्या देशमुखचा ऐतिहासिक विजय; बुद्धीबळ विश्वचषकात बाजी, ठरली पहिली भारतीय महिला विश्वविजेती

"प्रत्येक गोष्टीला..."; रेव्ह पार्टी प्रकरणात पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया