Viral Jokes In Marathi Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: ही गोष्ट आहे पुण्याची, दुपारचे २ वाजले होते...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> ही गोष्ट आहे पुण्याची, दुपारचे २ वाजले होते

एक मुंबई चा माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहीही अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच.
त्या दरवाजा वर “टणक ऊस” ??? असं एलीहून ठेवले होते
हे नाव का बर ठेवले असेल, असे तो माणूस विचार करू लागला.
त्याच्या मनात खूप जास्त उत्सुकता निर्माण झाली होती आणि हे उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. खूप विचार केल्यानंतर त्याने बेल मारली.

त्या घरातून एक म्हातारा बाहेर आला आणि त्या माणसाला तो प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“कायय् ?” म्हातारा बोलला .
“अहो ते… या बंगल्याचे नाव
“टणक  ऊस” का ठेवलय ?” असे तो माणूस बोलला
म्हातारा विस्कटलाच… “हे विचारायला दुपारची झोप जाळलीत माझी ? भामटेगिरी आहे ही” तो म्हतारा खूप चिडला होता आणि खूप रंगात होता.
” साँरी… पण आता झालीच आहे झोपमोड तर सांगा  ना “टणक ऊस” काय प्रकार आहे?”  चाचरत त्या  माणसाने विचारलं…
“निर्लज्ज आहात तुम्ही”
“ते झालंच पण “टणक  ऊस”….
“अहोssss…” म्हातारा फिस्करला
“अक्षर जुनी झाली की तुटून पडतात….. सगळ्यांना माहिती आहे हे ‘पाटणकर हाऊस‘ आहे….

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक