Ganeshotsav 2026 : उकडीचे नाही, आता बनवा माव्याचे मोदक; चवीला भन्नाट, बनवायलाही अगदी सोपे, वाचा रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2026 : उकडीचे नाही, आता बनवा माव्याचे मोदक; चवीला भन्नाट, बनवायलाही अगदी सोपे, वाचा रेसिपी

विशेष म्हणजे हे मोदक तयार करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया मावा मोदकाची सोपी रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या नैवेद्याची तयारीही सुरू होते आणि त्यात मोदकांना विशेष स्थान असतं. दरवर्षी उकडीचे मोदक बनवत असाल आणि यंदा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर माव्याचे मोदक नक्की ट्राय करा. मावा, साखर, केशर आणि वेलचीपासून तयार होणारे हे मोदक मऊसूत, स्वादिष्ट आणि सुगंधी लागतात. विशेष म्हणजे हे मोदक तयार करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया मावा मोदकाची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • १ कप ताजा मावा किंवा खवा

  • ¼ कप साखर

  • १ चमचा दूध

  • ७-८ केशराच्या काड्या

  • १ चमचा तूप

  • अर्धा चमचा वेलची पूड

कृती :

१. केशर भिजवून घ्या : सुरुवातीला कोमट दुधात केशराच्या काड्या घालून काही मिनिटे भिजत ठेवा.

२. मावा भाजून घ्या : कढईत तूप गरम करून त्यात मावा घाला. मावा आधी हाताने कुस्करून किंवा किसून घेतल्यास तो लवकर एकजीव होतो. मंद ते मध्यम आचेवर साधारण २ ते ३ मिनिटे मावा परतून घ्या.

३. साखर आणि केशर घाला : मावा मऊ झाल्यानंतर त्यात साखर आणि केशराचे दूध घाला. मिश्रण सतत ढवळत राहा. साधारण ५ मिनिटे किंवा मिश्रण कढईच्या कडा सोडू लागेपर्यंत शिजवा.

४. वेलचीची चव द्या : गॅस बंद करून त्यात वेलची पूड घाला आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

. मिश्रण थंड होऊ द्या : तयार मिश्रण एका ताटात किंवा बाऊलमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.

६. मोदकाचा आकार द्या : मोदकाच्या साच्याला थोडे तूप लावून घ्या. मिश्रणाचा छोटा गोळा साच्यात भरून घट्ट दाबा. अतिरिक्त मिश्रण काढून साचा अलगद उघडा आणि मोदक बाहेर काढा.

टिप्स :

  • मोदकासाठी ताजा आणि चांगल्या दर्जाचा मावा वापरा. यामुळे मोदकांची चव आणि पोत चांगली राहते.

  • मावा जास्त वेळ किंवा जास्त आचेवर भाजू नका. मिश्रण जास्त शिजल्यास मोदक कडक किंवा चिवट होऊ शकतात.

  • साखरेचे प्रमाण चवीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • साखरेऐवजी गूळ, नारळाची साखर किंवा ब्राउन शुगर वापरू शकता. मात्र त्यामुळे मोदकाचा रंग बदलू शकतो.

  • ताज्या वेलचीची पूड वापरल्यास मोदकाला अधिक छान सुगंध येतो.

  • मोदक साच्यातून सहज निघण्यासाठी साच्याला थोडे तूप लावणे आवश्यक आहे.

  • तयार मोदक हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये साधारण ५ दिवसांपर्यंत ठेवता येतात.

  • चवीत बदल करण्यासाठी माव्याच्या मिश्रणात बारीक चिरलेले काजू-बदाम किंवा थोडे सुके खोबरेही घालू शकता.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२