लाईफस्टाईल

Gatari Amavasya 2025 : गटारी अमावस्येचा खरंच 'गटार'शी काही संबंध आहे ? जाणून घ्या मूळ अर्थ

"गटारी आली रे!" म्हणत अनेकजण आपापल्या ग्रुपमध्ये प्लॅन्स आखायला लागले असतील. कुठे नॉनव्हेज पार्टी मेन्यू ठरत असेल तर कुठे कट्ट्यावरची धमाल ठरत असेल. पण गटारी अमावस्येचं नाव खरंच ‘गटारी’च आहे का?

Mayuri Gawade

"गटारी आली रे!" म्हणत अनेकजण आपापल्या ग्रुपमध्ये प्लॅन्स आखायला लागले असतील. कुठे नॉनव्हेज पार्टी मेन्यू ठरत असेल तर कुठे कट्ट्यावरची धमाल ठरत असेल. पण गटारी अमावस्येचं नाव खरंच ‘गटारी’च आहे का? आणि ही अमावस्या म्हणजे फक्त खाण्यापिण्याचा सण आहे का? हेच आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

'गटारी'चा अर्थ काय?

बहुतेकजण गटारी अमावस्येला फक्त मजा-मस्तीचं एक निमित्त समजतात. पण गटारीचा अर्थ केवळ इतकाच आहे का? आणि 'गटारी' या शब्दाचा 'गटार' या शब्दाशी काही संबंध आहे का, याची माहिती अनेकांना नसते.

'गटारी' हा शब्द अपभ्रंशातून तयार झालेला आहे. गटारीचं मूळ नाव ‘गतहारी अमावस्या’ असं आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार. हाच शब्द अपभ्रंश होऊन पुढे 'गटारी' झाला आणि पुढे पार्टींचा एक 'ट्रेंडी' सण ठरला!

यंदा कधी आहे गटारी ?

२०२५ मध्ये श्रावण २५ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे गटारी अमावस्या २४ जुलै रोजी साजरी होणार आहे. परंतु यंदा ही अमावस्या गुरुवारी आल्याने बहुतेक जणांनी रविवारपासूनच गटारी सेलिब्रेशन सुरू केले आहे.

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Mumbai : घराजवळील रुग्णालयासह उपचाराची माहिती एका क्लिकवर; आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

Mumbai : गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन 'एक खिडकी' योजना

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर