मॉडेल्स आणि अभिनेत्रींप्रमाणे सर्वांनाच मऊ आणि चमकदार त्वचा हवी असते. मात्र, त्यासाठी महागडे प्रोडक्ट्स वापरणे वेळच्या वेळी ब्युटी पार्लर किंवा स्पा मध्ये जाणे परवडत नाही. मात्र, तुम्ही जर तांदळाच्या पाण्यात काही गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्यास तुमची त्वचा विनाखर्चिक उपायांनी मऊ आणि चमकदार होईल. कारण तांदळाचे पाणी त्वचेसाठी अतिशय उत्तम असते. तांदळाच्या पाण्याने सनबर्नची समस्या देखील दूर होते. जाणून घ्या तांदळाचे पाणी चेहऱ्यासाठी कसे वापरावे जेणेकरून त्वचा होईल मऊ आणि चमकदार.
चेहऱ्यासाठी तांदळाचे पाणी कसे वापरावे?
गुलाब पाणी आणि तांदळाचे पाणी करा एकत्र
तुम्ही तांदळाचे पाणी गुलाबजलात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. एका स्प्रे बाटलीमध्ये गुलाबजल आणि तांदळाचे पाणी मिसळा. ते चेहऱ्यावर स्प्रे करा आणि नंतर तोंड स्वच्छ करा. विशेष करून उन्हाळ्यात गुलाबजल त्वचेला आरामदायी ठरते. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे त्वचेचा होणारा दाह गुलाबजल आणि तांदळाच्या पाण्याच्या स्प्रे ने कमी होतो.
चंदन पावडर आणि तांदळाचे पाणी
चंदन पावडर त्वचेसाठी चांगली असते. चंदन पावडरचे अनेक गुणधर्म त्वचेसाठी फार उपयुक्त असते. याने सुरकुत्या दूर होतात. त्वचा मऊ आणि चमकदार होते. चंदनाच्या पावडर जेव्हा तुम्ही ते तांदळाच्या पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावता तेव्हा ते चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास अत्यंत फायदेशीर ठरते. याच्या नियमित उपयोगाने हळूहळू चेहऱ्याचे डाग नष्ट होतात. तसेच कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि पैशांचीही बचत होते.
कोरफडीचे जेल आणि तांदळाचे पाणी
कोरफडीचा जेल त्वचा मऊ होण्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही ते तांदळाच्या पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. ते त्वचेला ताजेतवाने करते. यामुळे चेहरा अधिक चांगला उजळून निघेल.
मुलतानी माती आणि तांदळाचे पाणी
तुम्ही मुलतानी माती तांदळाच्या पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. तांदळाच्या पाण्यात मुलतानी माती मिसळा हा पॅक चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल. त्वचा स्वच्छ, छान आणि कोमल दिसेल.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)