रोजची बटाट्याची काप नकोयत? ट्राय करा गोवन स्टाईल आंबट बटाटा 
लाईफस्टाईल

रोजची बटाट्याची काप नकोयत? ट्राय करा गोवन स्टाईल आंबट बटाटा

मोजक्या साहित्यांत तयार होणारी बटाट्याची भाजी जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात केली जाते. कधी काप, तर कधी साधी भाजी… पण जर रोजची तीच चव कंटाळवाणी वाटू लागली असेल, तर यावेळी थोडा बदल करा. गोव्यात खास करून बनवली जाणारी आंबट बटाट्याची भाजी चवीला वेगळी, हलकी आणि खूपच रुचकर असते.

Mayuri Gawade

घरात पटकन काहीतरी चविष्ट बनवायचं असेल, तर बटाटा हा नेहमीच बेस्ट पर्याय ठरतो. कमी वेळात, मोजक्या साहित्यांत तयार होणारी बटाट्याची भाजी जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात केली जाते. कधी काप, तर कधी साधी भाजी… पण जर रोजची तीच चव कंटाळवाणी वाटू लागली असेल, तर यावेळी थोडा बदल करा. गोव्यात खास करून बनवली जाणारी आंबट बटाट्याची भाजी चवीला वेगळी, हलकी आणि खूपच रुचकर असते. चिंचेचा आंबटपणा, मसाल्यांचा सुगंध आणि खोबऱ्याची हलकी चव या भाजीला खास बनवते. चला तर जाणून घेऊया ही सोपी गोवन स्टाईल रेसिपी.

साहित्य

  • बटाटे

  • तेल

  • मीठ

  • मोहरी दाणे

  • मेथी दाणे

  • हिंग

  • हळद

  • लाल तिखट

  • गरम मसाला

  • चिंच

  • खोबरे (वाटलेले)

  • काळी मिरी

  • पाणी

कृती

आंबट बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्यांची साल काढून ते उभे काप करून घ्या. कापलेले बटाटे काळे पडू नयेत म्हणून थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करा. तेल चांगले तापल्यानंतर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडू लागली की त्यात चिमूटभर हिंग घालून लगेच मेथीचे दाणे टाका. आता पाणी काढून ठेवलेले बटाट्याचे तुकडे कढईत घालून हलक्या हाताने परतून घ्या.

बटाटे तेलात नीट परतल्यावर कढईवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर साधारण पाच मिनिटे त्यांना वाफ येऊ द्या. झाकण काढल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करा. यानंतर भिजवून काढलेले चिंचेचे पाणी घालून भाजीला हलकी उकळी येऊ द्या. चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार थोडे पाणी घालून भाजी शिजू द्या.

बटाटे पूर्णपणे मऊ शिजल्यानंतर त्यात थोडंसं खोबऱ्याचं वाटणं घालून हलवा. खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवू नका, त्यामुळे आंबट-तिखट चव दबली जाऊ शकते. भाजीला शेवटची वाफ दिल्यानंतर गॅस बंद करा. तयार झालेली गोवन स्टाईल आंबट बटाट्याची भाजी भात, पोळी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप