Good Friday 2026 : गुड फ्रायडेचा अर्थ काय? या दिवशी मासे का खातात? 
लाईफस्टाईल

Good Friday 2026 : गुड फ्रायडेचा अर्थ काय? या दिवशी मासे का खातात?

याच दिवशी येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यात आले होते. त्यामुळे हा दिवस आनंदाचा नसून त्याग, प्रार्थना आणि आत्मचिंतनाचा म्हणून पाळला जातो.

किशोरी घायवट-उबाळे

गुड फ्रायडे (Holy Friday) हा ख्रिश्चन, विशेषतः कॅथलिक धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यात आले होते. त्यामुळे हा दिवस आनंदाचा नसून त्याग, प्रार्थना आणि आत्मचिंतनाचा म्हणून पाळला जातो. ४० दिवसांच्या उपवास कालावधीचा हा शेवटचा टप्पा मानला जातो.

'गुड' फ्रायडे का म्हणतात?

येशू ख्रिस्तांच्या क्रूसावर चढवण्याच्या घटनेला 'गुड' का म्हटले जाते, हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. धार्मिक मान्यतेनुसार, येशूंचा मृत्यू हा मानवजातीच्या उद्धारासाठी झालेला बलिदान मानला जातो, म्हणून हा दिवस 'गुड' म्हणजेच पवित्र आणि कल्याणकारी मानला जातो. काहींच्या मते, God Friday या शब्दापासून Good Friday हा शब्द प्रचलित झाला.

मासे खाण्याची परंपरा का आहे?

गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिश्चन धर्मीय मांसाहार टाळतात, विशेषतः लाल मांस (जसे मटण, चिकन) खाणे निषिद्ध मानले जाते. त्याऐवजी मासे खाण्याची परंपरा आहे. यामागे धार्मिक आणि ऐतिहासिक कारणे आहेत. मासे हे समुद्रातून मिळणारे असल्याने त्यांना वेगळ्या प्रकारचे अन्न मानले जाते. तसेच, प्राचीन काळात मासा हा ख्रिश्चनांचा गुप्त प्रतीक (Symbol) होता. उपवासाच्या दिवशी साधे आणि सहज उपलब्ध अन्न म्हणूनही मासे निवडले जात होते.

गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो?

हा दिवस 'होली वीक'मधील सहाव्या दिवशी येतो आणि त्यानंतर इस्टर सण साजरा केला जातो. चर्चमध्ये विशेष प्रार्थना, भजन आणि येशूंच्या बलिदानाची आठवण करून देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी 'लॉर्ड्स सपर' ही पाळला जातो. या दिवशी ‘हॉट क्रॉस बन’सारखे पारंपरिक पदार्थ खाल्ले जातात. काही चर्चमध्ये कडू पेय (Vinegar आधारित) दिले जाते, जे येशूंच्या वेदनेचे प्रतीक मानले जाते.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड