हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेला अर्थात आज रविवारी (दि.३०) नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी गुढी पाडवा सण साजरा केला जातो. मात्र, गुढी पाडवा हा सण केवळ नववर्ष प्रारंभ दिन म्हणूनच साजरा केला जात नाही तर या दिवसाचे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तसेच धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे यादिवशी काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्या, अन्यथा घरातील सुख-शांती, समृद्धी धोक्यात येऊ शकते, अशी पारंपारिक मान्यता आहे.
गुढी पाडवा शुभ मुहूर्त
गुढी पाडवा हा ज्योतिष शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. मुहूर्त ही ज्योतिषीय कालगणनेप्रमाणे अत्यंत शुभ अशी वेळ असते. त्यामुळे गुढी पाडव्याला सर्व शुभ गोष्टी करतात. जेणेकरून घरात पुढील संपूर्ण वर्ष सूख-शांती, समृद्धी नांदावी. मात्र, यादिवशी काही नकारात्मक गोष्टी केल्याने घरातील सुख-शांती, समृद्धी धोक्यात येऊ शकते.
गुढी पाडव्याला या गोष्टी चुकूनही करू नका
उशिरा उठणे
गुढी पाडव्याला शक्यतो सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घ्यायला हवे. यामुळे दिवसाची सुरुवात मंगलमयी होते. मन प्रसन्न राहते. प्रसन्न मनाने सकारात्मक गोष्टी करता येतात.
अपशब्द बोलणे
गुढी पाडव्याच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये. त्यामुळे आपल्या आयुष्यात नकारात्मकतेचा शिरकाव होतो.
मांसाहार करणे
मांसाहार हा नकारात्मकतेशी जोडला गेलेला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. तर पारंपारिक पद्धतीने तयार केलेले शाकाहारी पदार्थ खावे. ज्यामुळे सकारात्मक गोष्टी घडू शकतात.
मद्यपान करणे
गुढी पाडव्याला मद्यपान करू नका. मद्यपान हे आरोग्यासाठी चांगले नसते. तसेच गुढी पाडव्याला मद्यपान केल्यामुळे घरातील सुख-शांती नष्ट होऊ शकते.
जुन्या वस्तू खरेदी करू नये
अनेक वेळा आपण आर्थिक कारणास्तव जुन्या गोष्टी किंवा सेकंड हँड गोष्टी खरेदी करतो. मात्र, गुढी पाडव्याला कोणाचीही वापरलेली जुनी वस्तू खरेदी करू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरण्याची दाट शक्यता असते.
दिवसा झोपू नये
आजच्या जीवनशैलीमुळे झोपण्याचे काही नियम राहिलेले नाही. अनेकजण रात्री उशिरापर्यंत काम करून दिवसा झोपतात. मात्र, गुढी पाडव्याच्या दिवशी दिवसा झोपू नये, असे केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)