लाईफस्टाईल

गुढीपाडवा, नववर्षात पैसा वाढीसाठी 'हे'नक्की करा !

Gudi Padwa 2025 : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते, म्हणजे येत्या ३० मार्चपासून होत आहे.

Krantee V. Kale

रीटा पालांडे

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते, म्हणजे येत्या ३० मार्चपासून होत आहे. या दिवशी कोणते उपाय केले म्हणजे आपली आर्थिक स्थिती चांगली होईल आणि उत्पन्न वाढ देखील होईल? नोकरीत आणि उद्योगधंद्यांमध्ये कोणते उपाय केले म्हणजे आपली आर्थिक प्रगती होईल? जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा .

कमळगट्टा माळ : गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कमळगट्टा माळ घेऊन उपासना करू शकता. कमळगट्टा माळीमध्ये माता लक्ष्मी वास करते यामुळे तुम्ही ही माळ उपासनेमध्ये वापरू शकता शिवाय ही माळ एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये गुंडाळून ते तुम्ही पैसे ठेवता किंवा दागिने ठेवता अशा तिजोरीमध्ये ठेवल्यास तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

कर दर्शन : या सोबतच तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कर दर्शन करू शकता. सकाळी उठल्यावर तुम्ही ज्या हाताने काम करता या हातांचं दर्शन घेऊन जमिनीला स्पर्श करून तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता.

या दोन उपायांसोबत गुढीपाडव्याला आणखी एक उपाय तुम्ही करू शकता ते म्हणजे तुम्ही प्राणी आणि पक्षी यांना खायला देऊ शकता. यामुळे तुमची आर्थिक वृद्धी होऊ शकते. गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी अनेकजण चांगल्या कामाची सुरुवात करतात. त्यामुळे हे सगळे उपाय तुम्ही जर गुढीपाडव्याला करणार असाल किंवा कराल तर तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते, तुमची प्रगती होऊ शकते शिवाय नोकरी आणि उद्योगधंद्यांमध्येही यश मिळून सर्वांगीण विकास होऊ शकतो. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

...तर वाहनचालकांच्या कमाईला फटका; ॲप आधारित कॅबवरील GST बाबत भीती

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Pune : सिया गोयलच्या पॉलिग्राफ चाचणीस संमती; केतन अगरवाल हत्याप्रकरणी तपासाला वेग

बदलापूर महानगरपालिका कधी? आमदार किसन कथोरे यांची विधानसभेत मागणी