लाईफस्टाईल

Guru Purnima 2025 : योग्य गुरु निवडणे का गरजेचे? जाणून घ्या गुरु दीक्षेचे महत्त्व...

एखाद्याला गुरु मानायचं म्हणजे नेमकं काय? आणि दीक्षा घेतल्याशिवाय काही गोष्टी अपूर्णच का मानल्या जातात? गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे समजून घेणं गरजेचं ठरतं…

Mayuri Gawade

१० जुलै रोजी साजरी होणारी गुरुपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक दिवस नसून, तो आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या व्यक्तीच्या सन्मानाचा दिवस आहे. वैदिक परंपरेपासून चालत आलेल्या या दिवशी गुरुंची महती अधोरेखित केली जाते.

गुरु म्हणजे नेमकं कोण?

खऱ्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने अंधःकार आणि भ्रम दूर करणाऱ्या व्यक्तीला गुरु म्हणतात. वेद-पुराणांमध्येही गुरूंचे स्थान अत्यंत उच्च मानले जाते.

गुरु कोणाला मानावं?

फक्त कोणीतरी मोठं व्यक्तिमत्व गुरु होण्यासाठी पुरेसं नसतं.

गुरु तोच —

  • जो आपल्याला आत्मज्ञान आणि जीवनदृष्टी देतो,

  • जो योग्य-अयोग्याचा भेद समजावून सांगतो,

  • आणि जो आपल्या आध्यात्मिक, बौद्धिक किंवा वैयक्तिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरतो.

आजच्या काळात गुरु म्हणजे केवळ धार्मिक संन्यासी नसून, शिक्षक, पालक, मार्गदर्शक, किंवा कुणीही सकारात्मक परिणाम करणारी व्यक्ती असू शकते.

गुरु दीक्षेचे महत्व काय?

सनातन धर्मातील शास्त्रांनुसार, जेव्हा आपण एखाद्या गुरूकडून आध्यात्मिक मार्गदर्शन स्वीकारतो, तेव्हा ‘दीक्षा’ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया ठरते. दीक्षेविना केलेले अनेक धार्मिक कर्मकांड फलदायी ठरत नाहीत, असं ग्रंथांमध्ये म्हटलं आहे. कथा, पूजन, दान तसेच देवालय बांधणीसारख्या कार्यांतही दीक्षा देणाऱ्या दानवंतांना अधिक पुण्यलाभ मिळते, असे सांगितले जाते.

गुरुपौर्णिमा : निवड आणि निष्ठेचा दिवस

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, केवळ एक दिवस साजरा करण्याऐवजी आपल्या जीवनात खराखुरा गुरु कोण आहे, हे शोधणे आणि त्यांचे मार्गदर्शन स्वीकारणे हाच खरा सन्मान ठरेल. गुरुंच्या आशीर्वादानेच जीवनातील अडथळ्यांना दिशा मिळते आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास