Freepik
लाईफस्टाईल

काळा गहू कधी खाल्लाय? जाणून घ्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे

काळा गहू हा NABI- राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था, मोहाली पंजाब येथील शास्त्रज्ञांच्या ७ वर्षांच्या अथक संशोधनाचे फलित आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले गव्हाचे हे वाण आजच्या काळातील गरजेनुसार विकसित करण्यात आला आहे. तुम्ही जर तुमच्या एकूणच आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक असाल तर तुम्हाला या गव्हाचा आहारात निश्चितच समावेश करायला हवा. चला जाणून घ्या काळ्या गव्हाचे आरोग्यासाठी फायदे.

Kkhushi Niramish

तुम्ही काळ्या गहूबद्दल कधी ऐकलंय, पाहिलंय किंवा खाल्लंय का? काळा गहू हा आरोग्यासाठी अतिशय उत्तम पौष्टिक आणि फायदेशीर आहे. काळा गहू हा NABI- राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था, मोहाली पंजाब येथील शास्त्रज्ञांच्या ७ वर्षांच्या अथक संशोधनाचे फलित आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेले गव्हाचे हे वाण आजच्या काळातील गरजेनुसार विकसित करण्यात आला आहे. तुम्ही जर तुमच्या एकूणच आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक असाल तर तुम्हाला या गव्हाचा आहारात निश्चितच समावेश करायला हवा. चला जाणून घ्या काळ्या गव्हाचे आरोग्यासाठी फायदे.

या गव्हाचा रंग काळा का आहे?

शरीराला पौषक तत्व देणाऱ्या फळे, भाज्या आणि फुलांमध्ये अँथोसायनिन हा एक वनस्पती रंगद्रव्य असतो. यामुळे त्यांना लाल, जांभळा आणि काळा रंग प्राप्त होतो. शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या गव्हाच्या वाणात अँथोसायनिनचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या गव्हाचा रंग काळा आहे.

काळ्या गव्हाचे फायदे

काळ्या गव्हाचा सर्वात महत्त्वाचा फायदा यातील अँथोसायनिन हे संयुग मानवी शरीरातील मुक्त रॅडिकल्स तयार होण्यास प्रतिबंध करते. यामुळे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

रक्तातील साखरेची पातळीवर नियंत्रण

काळ्या गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. त्यामुळे हा गहू सामान्य गव्हापेक्षा जास्त चांगला आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

ग्लुटेनमुक्त असल्याने पोटाच्या विकारांपासून संरक्षण

काळा गहू हा ग्लुटेनमुक्त आहे. परिणामी ज्या लोकांना पोटदुखीची समस्या आहे त्यांना सामान्य गव्हाची चपाती खाणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी काळा गहू उत्तम आहे. कारण ग्लुटेन नसल्याने पोटदुखीची समस्या निर्माण होत नाही.

लोहाची कमतरता पूर्ण करेल

काळ्या गव्हात सामान्य सोनेरी गव्हापेक्षा लोहाचे प्रमाण खूप अधिक आहे. सामान्य गव्हात केवळ २५ टक्के लोहाचे प्रमाण आहे. तर काळ्या गव्हात ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात लोह आहे.

कुठे पिकवला जातो काळा गहू?

काळ्या गव्हाचे उत्पादन सध्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात केले जात आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

नवी मुंबई मेट्रोचा विस्तार; मंत्रिमंडळ पायाभूत समिती बैठकीत मंजुरी, MMR मधील २२ हजार ६११ कोटींचे प्रस्ताव संमत

तप विश्वास, विकास आणि जनसहभागाचे!

आजचे राशिभविष्य, १० जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मधुमेहींनो लक्ष द्या! शुगर वाढण्याची चिंता सतावतेय? जेवणानंतर फक्त १० मिनिटे करा 'हे' काम

बदलत्या हवामानात इम्युनिटी वाढवेल 'हा' खास काढा; जाणून घ्या सोपी रेसिपी