FreePik
लाईफस्टाईल

काळा चहा पिण्याचे 'हे' फायदे माहित आहेत? जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

काळा चहा हा आरोग्यासाठी उत्तम असतो. काळा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. हृदय, मेंदू, पचनसंस्था, त्वचा यांचे आरोग्या उत्तम राखण्यासाठी काळा चहा पिणे लाभकारी ठरते. त्याचप्रमाणे कर्क रोगातही काळ्या चहाचे सेवन करणे चांगले राहते. जाणून घ्या काळा चहा पिण्याचे आरोग्यासाठीचे फायदे...

Kkhushi Niramish

चहा हे भारतीयांचे आवडते पेय आहे. चहा अनेकप्रकारचा असतो. मात्र, काळा चहा हा आरोग्यासाठी उत्तम असतो. काळा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. हृदय, मेंदू, पचनसंस्था, त्वचा यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काळा चहा पिणे लाभकारी ठरते. त्याचप्रमाणे कर्क रोगातही काळ्या चहाचे सेवन करणे चांगले राहते. जाणून घ्या काळा चहा पिण्याचे आरोग्यासाठीचे फायदे...

उर्जा

काळ्या चहामध्ये असलेले कॅफिन, कॉफीपेक्षा जास्त फायदेशीर असते. यामुळे मेंदू सतर्क राहण्यास मदत होते. जेणेकरून आपल्या शरिरात उर्जेचे प्रसरण सतत होत राहते.

त्वचा

काळ्या चहातील अँटीऑक्सिडंट त्वचा चमकदार होण्यासाठी मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकूत्या कमी होतात. तसेच त्वचेच्या कर्करोगापासूनही बचाव होऊ शकतो.

पचन

काळ्या चहामध्ये असलेले टॅनिन पचन क्षमता सुधारण्यासाठी फायदेशीर असते. पोटात गॅस होण्याच्या समस्येशिवाय पचनाशी निगडित इतर समस्यांमध्ये देखील खूप फायदेशीर ठरते. तसेच अतिसारच्या परिस्थितीत काळ्या चहाचे सेवन खूप फायदेशीर असते. जुलाब होत असल्यास काळ्या चहामध्ये लिंबू पिळून प्यायल्याने लगेचच आराम मिळतो.

मेंदू

मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काळा चहा पिणं खूपच उपयुक्त आहे. काळा चहा मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवतो. यामुळे तणाव कमी होतो. स्मरणशक्ती वाढते. मेंदू पूर्वीपेक्षा अधिक सतर्क आणि सक्रिय बनते.

कर्क रोग

आहारात दररोज नियमितपणे काळा चहा घेतल्यास भविष्यात प्रोस्टेट, डिम्बग्रंथी आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्यापासून टाळता येऊ शकते. तसेच काळा चहा प्यायल्यानं कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्यासाठी मदत होते. काळा चहा प्यायल्यानं स्त्रियांमधील होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाच्या शक्यतेला कमी करून तोंडाच्या होणाऱ्या कर्करोगापासून देखील संरक्षण होण्यास मदत मिळते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’