Freepik
लाईफस्टाईल

फक्त व्हिटामिन C नाही तर 'या' खनिजांचा आणि पोषक तत्वांचा खजाना आहे आंबट-चिंबट चिंच!

चिंचेत फक्त व्हिटामिन C नाही तर अन्य खनिजे आणि पोषक द्रव्यांचा देखील मोठा खजाना आहे. संस्कृतमध्ये याला आमलकी म्हणतात, त्यावरूनच पुढे हिंदीमध्ये इमली हा शब्द तयार झाला. जाणून घेऊ आरोग्यासाठी चिंच किती फायदेशीर.

Kkhushi Niramish

उन्हाळा लागलाय चिंचेची झाडे चिंचांनी छान बहरली आहे. लहानपणीचे दिवस आठवा भर उन्हातही दगड मारून चिंचा पाडून त्या चोखून चोखून खाताना किती आनंद व्हायचा. तसेच चिंचेच्या त्या आंबट-चिंबट गोळ्या आहा तोंडाला पाणी सुटलं ना! तर अशी ही चिंच आरोग्यासाठी औषधी गुणांनी फार उंच आहे. चिंचेत फक्त व्हिटामिन C नाही तर अन्य खनिजे आणि पोषक द्रव्यांचा देखील मोठा खजाना आहे. संस्कृतमध्ये याला आमलकी म्हणतात, त्यावरूनच पुढे हिंदीमध्ये इमली हा शब्द तयार झाला. जाणून घेऊ आरोग्यासाठी चिंच किती फायदेशीर.

मेंदूला सूज येण्यापासून वाचवते

मेंदूसाठी चिंच ही गुणकारी आहे. चिंचेत लुटोलिन नावाचं न्यूरो प्रोटेक्टिव्ह आहे. हे मेंदूला सूज येण्यापासून वाचवते.

हाडांच्या बळकटी करणासाठी

हाडांच्या मजबूतीसाठी आणि बळकटीकरणासाठी कॅल्शिअम आणि व्हिटामिन C हे मोठ्या प्रमाणात असतात. चिंचेत व्हिटामिन C तर आहेच सोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं कॉम्बिनेशन आहे. जे हाडं बळकट करते.

वजनावर नियंत्रण

वजन वाढण्याच्या समस्या अनेकांना आहेत. वजन कमी करण्यासाठी चिंच ही उत्तम आहे. चिंचेमधील हायड्रॉक्सिसायट्रिक ऍसिड (HCA) वजन कमी करायला मदत करते.

पोट आणि लिव्हरचे आरोग्य जपते

तुम्हाला जर पोट साफ न होण्याची समस्या असेल तर तुम्ही एक चिंचेची गोळी खाल्लीच पाहिजे. चिंच ही नैसर्गिक लेक्सेटिव्ह आहे. त्यामुळे चिंच पोट साफ करण्याचे काम करते. आपल्या लिव्हरला संरक्षण देण्याचं काम चिंचेमधील प्रोसायनीडीन हे अँटिऑक्सिडंट करतं.

पोटॅशिअमचे हृदय आणि रक्तदाबासाठी फायदे

चिंचेमध्ये पोटॅशियम आहे जे तुमचं हृदय सुरक्षित ठेवत. रक्तदाब नियंत्रित करतं.

व्हिटामिन C चा मोठा स्रोत सोबतच...

चिंच ही व्हिटामिन C चा मोठा स्रोत आहे. व्हिटामिन सी दातांचे आरोग्य, केसांचे आरोग्य, थकवा दूर करणे, हाडांचे बळकटीकरण करणे यासाठी आवश्यक असते. सोबतच रोगप्रतिकारक शक्तिही वाढवते. याचबरोबर थायामीन आणि फॉलेट ही दोन व्हिटॅमिन बी आहेत. याचा देखील आरोग्यला लाभ होतो.

चिंच नक्की रोज स्वयंपाकात वापरा ,त्याचे सरबत करा किंवा अशीच खा आणि बळकट व्हा!

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप