Health Tips : मसाले आरोग्यासाठी फायदेशीर, पण 'हे' कॉम्बिनेशन ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Health Tips : मसाले आरोग्यासाठी फायदेशीर, पण 'हे' कॉम्बिनेशन ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

प्रत्येक मसाल्यांची जोडी शरीरासाठी चांगलीच ठरते असे नाही. काही मसाले चुकीच्या पद्धतीने किंवा अति प्रमाणात एकत्र सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना विशेष महत्त्व आहे. हळद, दालचिनी, लवंग, जायफळ यांसारखे मसाले केवळ पदार्थांची चव वाढवत नाहीत, तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. सध्या फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइलकडे लोकांचा वाढता कल पाहता अनेकजण वेगवेगळ्या मसाल्यांचे कॉम्बिनेशन वापरताना दिसतात. मात्र, प्रत्येक मसाल्यांची जोडी शरीरासाठी चांगलीच ठरते असे नाही. काही मसाले चुकीच्या पद्धतीने किंवा अति प्रमाणात एकत्र सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

अख्खे मसाले की पावडर? काय अधिक सुरक्षित?

स्वयंपाक करताना अनेकजण तयार मसाला पावडर वापरणे पसंत करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, अख्खे मसाले वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते. मसाला पावडरमध्ये भेसळीची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्य असल्यास अख्खे मसाले खरेदी करून घरच्या घरी वाटून वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

हळद आणि काळी मिरीचे कॉम्बिनेशन नेहमीच फायदेशीर नसते

हळद आणि काळी मिरी हे आरोग्यासाठी उत्तम कॉम्बिनेशन मानले जाते. काळ्या मिरीतील पिपरीनमुळे हळदीतील कर्क्युमिन शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते. मात्र हे मिश्रण जास्त तापमानावर शिजवल्यास त्यातील अनेक पोषक घटक नष्ट होऊ शकतात. त्यामुळे या मसाल्यांचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

दालचिनी आणि लवंग जास्त प्रमाणात खाणे टाळा

दालचिनी आणि लवंग हे दोन्ही मसाले दाह कमी करण्यास मदत करतात. मात्र रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी हे मसाले जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, या मसाल्यांचा अति वापर यकृतावर ताण निर्माण करू शकतो.

रिकाम्या पोटी जायफळ आणि हळदीचे सेवन ठरू शकते त्रासदायक

जायफळ आणि हळद रिकाम्या पोटी एकत्र सेवन केल्यास पोटात जळजळ, मळमळ आणि ॲसिडिटीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे मिश्रण घेताना काळजी घेणे गरजेचे आहे.

मसाल्यांचा वापर करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

प्रमाणात सेवन करा - कोणताही मसाला जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. अति सेवनामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.

योग्य वेळ महत्त्वाची - हळद सकाळी, जायफळ रात्री तर दालचिनी-लवंगाचा चहा मर्यादित प्रमाणात घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

घरगुती मसाले वापरा - भेसळ टाळण्यासाठी घरच्या घरी वाटलेले मसाले वापरण्याचा प्रयत्न करा.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

जर तुम्ही नियमित औषधे घेत असाल किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर मसाल्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया