(Photo-Yandex)
लाईफस्टाईल

Sprouted Moong Salad : सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी मोड आलेल्या मुगाचे सलाड; नोट करा सोपी रेसिपी

कमी तेल, जास्त पोषण आणि ताजेपणा यामुळे हा नाश्ता आपण रोजही खाऊ शकतो. जाणून घ्या हेल्दी नाश्त्याची सोपी रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

रोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे. मोड आलेले मूग सलाड हा एक असा हेल्दी पर्याय आहे जो पचनास हलका, प्रथिनांनी भरपूर आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. कमी तेल, जास्त पोषण आणि ताजेपणा यामुळे हा नाश्ता आपण रोजही खाऊ शकतो. जाणून घ्या हेल्दी नाश्त्याची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • मोड आलेले मूग - १ कप

  • कांदा (बारीक चिरलेला) - १

  • टोमॅटो (बारीक चिरलेला) - १

  • काकडी (बारीक चिरलेली) - १

  • हिरवी मिरची (आवडीनुसार, बारीक चिरलेली) - १

  • कोथिंबीर (चिरलेली) - २ टेबलस्पून

  • लिंबाचा रस - १ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • मिरपूड पूड / लाल तिखट - अर्धा टीस्पून

  • भाजलेली जिरे पूड - अर्धा टीस्पून

कृती :

मोड आलेले मूग स्वच्छ धुवून ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये मोड आलेले मूग घ्या. त्यात कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची घाला. त्यानंतर मीठ, मिरपूड पूड, जिरे पूड आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळा. वरून कोथिंबीर घालून सलाड सजवा. ताजं आणि पौष्टिक सलाड सर्व्ह करण्यासाठी तयार!

टिप्स :

पचनासाठी त्रास होत असेल तर थोडे वाफवलेले मूग वापरा. प्रथिनं वाढवण्यासाठी उकडलेले शेंगदाणे किंवा चणे वापरू शकता. आवडीनुसार सलाडमध्ये डाळींबाचे दाणेही वापरू शकता.

वजन कमी करायचं असेल तर सकाळी किंवा वर्कआउटनंतर स्प्राऊट हा उत्तम पर्याय आहे. हा सलाड जास्त वेळ ठेऊ नका. ताजे सलाडच जास्त चविष्ट लागते.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग