YouTube - Kalpanas Recipe Marathi
लाईफस्टाईल

होळीसाठी कुरकुरीत आणि हसरे अनारसे बनवण्यासाठी 'या' काही खास टिप्स

अनारसे बनवताना अनेक वेळा तक्रार असते अनारसे कुरकुरीत आणि हसरे होत नाही किंवा अनेक वेळा अनारसे तुटतात. परिणामी बनवण्याचा मूड निघून जातो. होळीसाठी अनारसे बनवण्यासाठी या काही खास टिप्स

Kkhushi Niramish

होळीसाठी अनेक ठिकाणी अनारसे बनवण्याची पद्धत आहे. मात्र, अनारसे बनवताना अनेक वेळा तक्रार असते अनारसे कुरकुरीत आणि हसरे होत नाही किंवा अनेक वेळा अनारसे तुटतात. परिणामी बनवण्याचा मूड निघून जातो. होळीसाठी अनारसे बनवण्यासाठी या काही खास टिप्स

प्रमाणात अचूकता

अनारसे व्यवस्थित न होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अनारसे बनवण्यासाठी पीठाचे आणि अन्य साहित्यांचे प्रमाण अचूक असायला हवे. प्रमाण चुकले तर अनारसे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे खास लक्ष द्या.

साहित्य:-

१ पातेले अनारसे पीठ

पाऊण पातेले गूळ

2 छोटी केळी

तळण्यासाठी तेल

खस-खस

अनारसे पीठ कसे तयार करावे?

सर्वप्रथम तांदूळ निवडून आणि धुवून घ्या. कापड अंथरून त्यावर ओले तांदूळ निवडून टाका. हे छान हलके वाळल्यानंतर तांदळाचे पीठ तयार करून घ्या. पीठ तयार करताना हे पीठ खूप जास्त बारीक असणार नाही याची काळजी घ्या. नंतर हे पीठ छान चाळणीने चाळून घ्या.

गुळ छान उत्तम किसून घ्या. गुळात हे पीठ मिक्स करून घ्या. नंतर त्याचे गोळे बनवून ठेवा. काही वेळाने हे गोळे पुन्हा मळून त्यात दोन कुस्करून टाका. आता हे मिश्रण एकत्र करून अनारसे तयार करून घ्या. पीठ मळताना खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. आता ताटात या पीठाच्या छोट्या-छोट्या जाडसर गोल गोल चकत्या करून घ्या. त्याला वरून खसखस लावा आणि तुपात तळून घ्या.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत