नवीन कार्य करण्यासाठी अशुभ मानल्या जाणाऱ्या होळीपूर्वीचे होलाष्टक आजपासून (दि.७) सुरू झाले आहे. १३ मार्चला होलिका दहनपर्यंत हा काळ राहणार आहे. होलिका दहन अर्थात होळीपूर्वीचे आठ दिवस होलाष्टक म्हणून मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ अशुभ आणि नकारात्मक मानला जातो. २०२५ चा होलाष्टक काही राशींना अत्यंत अशुभ जाणार आहे. जाणून घेऊ कोणत्या राशींवर यंदाच्या होलाष्टकचे संकट गडद असणार आहे.
होलाष्टक २०२५ चा या राशिंवर अशुभ प्रभाव
मेष : मेष राशींसाठी होलाष्टक फायरच कष्टदायक ठरणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये हा काळ कठीण ठरणार आहे. खूप मेहनत करूनही मनासारखे यश मिळणार नाही. व्यावसायिक आणि नोकरदार दोन्ही प्रकारच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागणार. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करावे लागणार. अन्यथा फसवेगिरी संभवते.
वृषभ : या राशीच्या लोकांनी पैसा सांभाळून खर्च करावा. कारण होलाष्टकच्या प्रभावामुळे वायफळ खर्च मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. तर महिलांना घर आणि नोकरी सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच या राशीतील लोकांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या.
कन्या : या राशितील लोकांसाठी यंदाचा होलाष्टक काहीसा आंबड-गोड ठरणार आहे. कौटुंबिक कलहांना सामोरे जावे लागू शकते. तर आरोग्यावरही गंभीर परिणाम संभवतात. तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच नात्यांमध्ये कटुता येण्याची संभावना आहे त्यामुळे सांभाळून राहावे लागणार आहे.
मकर : या राशीतील लोकांनी विशेषत्वाने निष्काळजीपणे कार्य करू नये. त्यामुळे व्यवसायात गंभीर नुकसान होऊ शकतात. तसेच कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व्यावसायिक स्पर्धेतील आव्हानांसाठी तयार राहावे लागणार आहे.
कुंभ : होलाष्टक काळात कुंभ राशीच्या लोकांनाही कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वादावादी संभवते. त्यामुळे घराचे वातावरण बिघडू शकते. व्यापारी वर्गाला सततच्या प्रवासामुळे आरोग्याचे दुष्परिणाम संभवू शकतात. तसेच वाहन जपून चालवण्याचा सल्ला ज्योतिषांकडून देण्यात येत आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)