फोटो : सो FPJ
लाईफस्टाईल

Holi 2025 : त्वचेच्या सुरक्षेसाठी 'या' पद्धतीने साजरी करा DIY Organic होळी

केमिकल्सयुक्त रंगांचा वापर त्वचेसाठी योग्य नाही, याच्या वापरामुळे त्वचेला चट्टे, काप, अॅलर्जी इत्यादी समस्या होऊ शकतात.

Krantee V. Kale

होळीचे रंग खेळताना सर्रासपणे केमिकल्सयुक्त रंगांचा वापर केला जातो. पण, या केमिकल्सयुक्त रंगांमुळे तुमच्या चेहऱ्यावर काय परिणाम होतो याचा विचार केलाय का? याच्या वापरामुळे त्वचेला चट्टे, काप, अॅलर्जी इत्यादी समस्या होऊ शकतात. त्यामुळे त्वचेची योग्य ती काळजी घेऊन आणि हानी न होता होळी खेळण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे 'DIY होळी कलर (घरच्या घरी रंग बनवणे) किंवा ऑर्गेनिक कलर्सचा वापर करणे. म्हणजेच जे रंग घरच्या घरी आणि निसर्गात उपलब्ध असतात. या रंंगांचा वापर करुन पर्यावरणपुरक होळी म्हणजेच 'DIY ऑर्गेनिक होळी' तुम्ही साजरी करु शकता. रंगांच्या या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पुढे दिलेली माहिती एकदा पाहा आणि यंदा पर्यावरणपूरक होळी साजरी करा.

साहित्य : चण्याचे पीठ, हळद, झेंडूचे फूल, गाजर, बीट, गुलाबपाणी, लिंबाचा रस, जास्वंदाचे फूल, तांदळाचे पीठ, लाल केसर, भारतीय आवळ्या इत्यादी.

पिवळा

पिवळ्या रंगासाठी तुम्ही चण्याची कणिक आणि हळदीचे १:२ प्रमाणात मिश्रण पाण्यामध्ये मिसळा. हे मिश्रण तुमच्या हाताने एकसारखे होईपर्यंत मिसळून घ्या. नंतर ते दोन ते तीन वेळा गाळणीने गाळा.

तुम्ही झेंडूच्या फुलांना पाण्यामध्ये उकळून किंवा हळदीच्या पाण्यामध्ये घालून ओला पिवळा रंग तयार करू शकता. हळद ऑर्गेनिक असली पाहिजे, त्यामुळे नैसर्गिक आणि चांगला रंग तयार होईल.

जांभळा

तुम्ही काळे गाजर मिक्सरमध्ये वाटून त्यात मक्याची कणिक मिसळा. नंतर, ते वाळवण्यासाठी ठेवा. त्यामध्ये सुगंधासाठी तुम्ही गुलाबपाणी देखील घालू शकता.

लाल

हळदीत लिंबाचा रस मिसळा. लिंबाचा रस आम्लस्वभावी असतो आणि तो हळदीला लाल रंग देईल. नंतर, मिश्रण एका चांगल्या हवेच्या खोलीत ठेवा, जेणेकरून ते वाळले जाईल. कृपया सूर्यप्रकाश टाळा, नाहीतर मिश्रण फिकट होईल.

लाल रंग बनवण्यासाठी तुम्ही लाल जास्वंदाच्या फुलांना वाळवून नंतर मिक्सरमध्ये पावडर करून घ्या. नंतर, रंगाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी लाल केसर एकसारख्या प्रमाणात मिसळा, लाल रंग बनेल.

ग्रे रंग

तुम्ही भारतीय आवळ्याच्या बिया वापरून ग्रे रंग तयार करू शकता. बिया वाळवलेल्या पिठात मक्याची कणिक मिसळा आणि ते वापरा.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत