Canva
लाईफस्टाईल

Lunar Eclipse : होळीच्या रंगात पडणार भंग? जाणून घ्या चंद्रग्रहणाची वेळ आणि काय पडेल प्रभाव?

जाणून घ्या, चंद्रग्रहणाची वेळ काय आहे. किती वाजल्यापासून ग्रहण लागणार असून किती वाजेपर्यंत ग्रहण आहे. काय काळजी घ्याल.

Kkhushi Niramish

होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशात उद्या (दि.१४) रंगांची उधळण करत होळी खेळली जाणार आहे. मात्र याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण असल्याने होळीच्या रंगात भंग पडू शकतो. चंद्रहग्रहणामुळे होळी खेळू का नये? चंद्रग्रहणामुळे होळी पार्टीला बनवलेले वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ का नये? चंद्रग्रहणाचा काय प्रभाव पडेल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्रग्रहणात सूतक पाळावे लागणार का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत असणार. जाणून घ्या, चंद्रग्रहणाची वेळ काय आहे. किती वाजल्यापासून ग्रहण लागणार असून किती वाजेपर्यंत ग्रहण आहे. काय काळजी घ्याल.

चंद्रग्रहणाची वेळ

२०२५ सालचे पहिले चंद्रग्रहण १४ मार्च रोजी सकाळी ९:२९ ते दुपारी ३:२९ या वेळेत होणार आहे. ज्योतिष गणनेनुसार चंद्रग्रहण सिंह राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. यावेळी चंद्रावर शनि आणि सूर्यची दृष्टी असणार आहे.

भारतात चंद्रग्रहण दिसणार का?

यंदाचे चंद्रग्रहण सकाळी लागणार असल्यामुळे ते भारतात दिसणार नाही. हे ग्रहण युरोप, ऑस्ट्रेलियाच्या काही भागात, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत आणि अटलांटिक महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवासहित आशिया आणि आफ्रिका खंडातील काही भागात दिसणार आहे.

चंद्रग्रहणात सूतक काळ पाळावे लागणार का?

वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण उपच्छाया चंद्रग्रहण प्रकारातील असून हे चंद्रग्रहण सकाळी लागणार आहे. त्यामुळे ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ पाळावे लागणार नाही.

होळीवर या चंद्रग्रहणाचा प्रभाव पडणार?

होळीला चंद्रग्रहण १४ मार्चला लागणार आहे तर होलिका दहन हे १३ मार्चला आहे. तसेच चंद्रग्रहण हे दिवसा असल्यामुळे ते भारतात दिसणार नाही. याशिवाय उपच्छाया ग्रहण धार्मिक कर्मकांडासाठी फारसे महत्त्वपूर्ण नसते. त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर फारसा प्रभाव पडणार नाही.

चंद्रग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये?

यंदाच्या चंद्रग्रहणात कोणतेही सूतक काळ लागणार नाही. सूतक नसल्यामुळे ग्रहण काळात पाळले जाणारे कोणतेही नियम पाळावे लागणार नाही. त्यामुळे हा काळ नेहमीप्रमाणे सामान्यच राहणार असून मनसोक्त होळी खेळता येणार आहे. होळीच्या रंगात कोणताही भंग होणार नाही.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी