'एआय' ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Holi Special Drinks : रंगांच्या सणात थंडाईसोबत कैरीचे पन्हे; घरच्या घरी बनवा टेस्टी ड्रिंक

थंडाई हा होळीचा पारंपरिक पेय पर्याय असला, तरी यंदा काहीतरी वेगळं आणि हेल्दी ट्राय करायचं असेल तर 'कैरीचे पन्हे' (आंब्याचे पन्हे) हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

किशोरी घायवट-उबाळे

होळी म्हटली की रंग, आनंद, धम्माल आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल! रंग खेळल्यानंतर शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा देणारे पेय पिण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. थंडाई हा होळीचा पारंपरिक पेय पर्याय असला, तरी यंदा काहीतरी वेगळं आणि हेल्दी ट्राय करायचं असेल तर 'कैरीचे पन्हे' (आंब्याचे पन्हे) हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

थंडाई शरीराला पोषण देते, तर पन्हे उकाड्यात डिहायड्रेशनपासून संरक्षण करण्यास मदत करते. पाहुणचारासाठी किंवा कुटुंबासोबत होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही दोन्ही पेये घरच्या घरी सहज तयार करता येतात.

साहित्य :

  • कच्च्या कैऱ्या - २

  • साखर किंवा गूळ - पाऊण कप

  • वेलची पूड -

  • मीठ - चिमूटभर

  • भाजलेले जिरे पूड - अर्धा टीस्पून

  • थंड पाणी - ३ ते ४ ग्लास

कृती :

कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यातील गर काढून मिक्सरमध्ये साखर/गूळ घालून पेस्ट तयार करा. त्यात मीठ, जिरे पूड आणि वेलची घाला. सर्व्ह करताना थंड पाण्यात मिसळून बर्फ घालून द्या.

टिप्स :

  • पन्ह्याचे कॉन्सन्ट्रेट बनवून फ्रिजमध्ये ४ ते ५ दिवस साठवू शकता.

  • जिरे पूड आणि मीठ घातल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात.

होळीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर शरीराला थंडावा आणि ऊर्जा देणारे पेय घेणे आवश्यक असते. पारंपरिक थंडाईसोबतच कैरीचे पन्हे हा आरोग्यदायी आणि ताजेतवाने पर्याय ठरू शकतो. यंदाच्या होळीत पाहुण्यांना आणि कुटुंबियांना या खास पेयांनी सरप्राईज द्या.

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी